नाशिक: अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याकडून बलात्कार; गुन्हा दाखल
नाशिक (प्रतिनिधी): अल्पवयीन मुलगी घरात असल्याचे संधी साधून शेजारी राहत असलेल्या नराधमाने बलात्कार केल्याचा प्रकार अंबड परिसरात घडल्याचे उघडकीस आला आहे.
राजेश असे संशयित नराधमाचे नाव असून पोलिस त्याचा शोध घेत असून, त्याच्याविरोधात पोस्कोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गेल्या रविवारी (ता.४) ते बाहेर गेल्याने घरात त्यांची अल्पवयीन मुलगी घरात एकटीच होती. ही संधी साधून त्यांच्या शेजारी राहणाऱ्या संशयित राजेश हा फिर्यादीच्या घरी गेला. घरात अल्पवयीन मुलीचा बळजबरीने हात पकडून त्याच्या घरात घेऊन गेला.
यावेळी त्याने तिच्याशी जबरदस्तीने अश्लिल चाळे करून बलात्कार केला आहे. सदरची बाब कुटूंबियांना समजताच त्यांनी पोलिसात धाव घेतली. याप्रकरणी अंबड पोलिसात पोस्कोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक सोनवणे हे तपास करीत आहेत. संशयित राजेश याचा पोलिस शोध घेत आहेत.