नाशिक: अभ्यास येत नाही म्हणून सावत्र बापाकडून पाच वर्षांच्या चिमुरडीला चटके..
जयेश साबळे, महाराष्ट्र एक्सप्रेस ग्रुप, नाशिक
सावत्र बापाकडून पाच वर्षांच्या मुलीला “अभ्यास येत नाही” या कारणावरून अमानुष मारहाण आणि चटके दिल्याची खळबळजनक घटना नाशिकच्या सातपूर पोलिस ठाणे हद्दीत घडली आहे..
या प्रकरणी मुलीच्या आईने सातपूर पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली आहे.
सातपूरच्या जाधव संकुल येथील एका महिलेच्या पहिल्या पतीचे अपघाती निधन झाले होते.त्यांनतर,
त्यांनतर, तिने दुसरा विवाह केला होता. तिला पहिल्या पतीकडून पाच वर्षांची मुलगी आहे. हे सर्व एकत्र राहत होते. उदरनिर्वाहासाठी महिला ही कामासाठी दररोज बाहेर जात होती, याच वेळी तिच्या दुसऱ्या पतीकडून तिच्या पाच वर्षांच्या लहान मुलीला अभ्यास येत नाही म्हणून अनेक वेळी अमानुष मारहाण केली जात होती. त्यातच पुन्हा या सावत्र बापाकडून या कारणावरून पीडित मुलीला मारहाण करून तिला चटके देण्यात आले. ही बाब लक्षात येताच मुलीच्या आईने सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी याबाबत गुन्हा नोंदवून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
[wpna_related_articles title=”More Important News” ids=”8575,8563,8548″]
पीडित मुलीला तिच्या सावत्र पित्याकडून त्याच्या मालेगाव येथील घरी नेण्यात आले होते तर त्याच्या घरच्यांकडून सदर मुलीला शेजारील घरात पलंगाखाली लपवून ठेवले होते. पीडित मुलीच्या आईच्या परिचयातील महिला आणि व्यक्तींकडून मालेगाव गाठून या मुलीची सुटका केली आहे. या घटनेतील आरोपी सावत्र बापाला कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी मारहाण झालेल्या मुलीच्या आईकडून व तिच्या नातेवाईकांकडून केली जात आहे. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ०१५१/२०२१ नुसार भारतीय दंड विधान ३२३, ३२४, ५०४, ५०६ आणि बाल न्याय अधि. २००० (मुलांची काळजी व संरक्षण) ७५ या प्रमाणे संशयित आरोपी देविदास शेवाळे याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
Amazon Great Indian Festival Best Selling Products.. Do Not Miss !