नाशिक: अंगावर गरम पाणी पडल्याने चिमुकलीचा मृत्यू; अवघ्या दोन मिनिटांत होत्याचं नव्हतं झालं
नाशिक (प्रतिनिधी): अंघोळीचं गरम पाणी अंगावर पडून भाजल्याने १० महिन्याच्या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ह्या हृदयद्रावक घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
जुना गंगापूर नाका परिसरात ही दुर्दैवी घटना घडली.
चिमुकलीच्या अंघोळीसाठी गरम पाणी काढले असता, ते अंगावर पाणी सांडल्याने अवघ्या 10 महिन्याची चिमुकली भाजली. उपचारादरम्यान तिचा मृत्यु झाल्याची दुदैवी घटना घडली.
आवेरा शुभम इंगळे असे मयत चिमुकलीचे नाव आहे. परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
ह्या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अंघोळीसाठी तापवलेले पाणी काढून ठेवलेले असतानाच बाथरूमध्ये गेलेल्या दहा महिन्यांच्या चिमुकलीचा धक्का लागून तिच्या अंगावर पाणी पडल्याने गंभीररीत्या भाजली. पाच दिवस उपचाराला प्रतिसाद देणाऱ्या चिमुकलीची मंगळवारी प्राणज्योत मालवली. जुना गंगापूर नाका परिसरात असलेल्या राठी आमराई भागातील श्री साई अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या शुभम इंगळे यांची कन्या आवेरा ही शनिवारी खेळतच बाथरूमध्ये गेली. यावेळी अंगावर गरम पाणी पडल्याने ती गंभीर भाजली. तिला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
या प्रकरणी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, दीड महिन्यापूर्वीच खेळताना तोल जाऊन हौदात पडल्याने आदि चव्हाण हा बालक बेशुद्ध झाला होता. त्याचाही उपचारावेळी मृत्यू झाला होता.