नाशिक: अंगावरची हळदही अजून फिटली नव्हती अन् विवाहाच्या चौथ्या दिवशी तिने घेतला अखेरचा श्वास

नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

नाशिक: अंगावरची हळदही अजून फिटली नव्हती अन् विवाहाच्या चौथ्या दिवशी तिने घेतला अखेरचा श्वास

नाशिक (प्रतिनिधी): सुखी संसाराचे स्वप्ने पाहत तिने रेशीमगाठ बांधली होती. तिच्या अंगावरची हळदही अजून फिटली नव्हती. सासरी दाराला तोरण बांधले होते. आनंदाने तिने उंबरठा ओलांडला होता. घर आनंदाने नाचत असतानाच सारे शोकसागरात बुडाले.

पूनम सोपान कोल्हे या अठरा वर्षीय नववधूचे विवाहाच्या चौथ्या दिवशीच आकस्मिक निधन झाले. कोळम (ता. येवला) येथील रहिवासी धनंजय जनार्धन चव्हाण यांची ती कन्या होती.

१७ मार्चला शुक्रवारी तिचा विवाह आहेरवाडी ग्रुप ग्रापंचायतीचे उपसरपंच व हडप सावरगावचे रहिवाशी रामनाथ विष्णू कोल्हे यांचे पुतणे व सुखदेव कोल्हे यांचे पुत्र सोपान यांच्याबरोबर थाटामाटात झाला.

धक्कादायक: नाशिक शहरात शाळेबाहेर दहावीच्या विद्यार्थ्यावर टोळक्याचा कोयत्याने हल्ला

रितीरिवाजाप्रमाणे नवरी मुलगी सासरी गेली. पहिल्या मुलाला नवरी मुलगी घरी आली. त्यानंतर लागलीच पुन्हा सासरी गेली. पुन्हा दोन दिवसांनी दुसऱ्या मुळाला परत आली. यावेळी तील सर्दी, थंडी, ताप अशी लक्षणे जाणवली. म्हणून घरच्यांनी खासगी क्लिनिकमध्ये दाखल केले. येथील प्राथमिक उपचारानंतर तिला येवला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

…अन्यथा नाशिकच्या जनतेचा उद्रेक तुम्हाला पाहायला मिळेल, पोलीस आयुक्तांना भुजबळांचा इशारा

मात्र उपचार सुरु असतांनाच तिचा  मृत्यू झाला. त्यामुळे कोळम येथील चव्हाण परिवार व हडप सावरगाव येथील कोल्हे परिवारासह संपूर्ण गांव शोकसागरात बुडाला. बुधवारी (ता.२२) शोकाकूल वातावरणात पूनमचा अंत्यविधी करण्यात आला. याप्रसंगी कुटुंबियांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

नाशिक: अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या

संपूर्ण गाव शोकसागरात:
दरम्यान पूनम ही गावात सर्वांचीच लाडकी असल्याने लग्नासाठी अख्खा गाव जमलला होता. त्या दिवशी संपूर्ण लग्नात सहभागी होत. लग्न पार पडलं. मात्र त्यानंतर लग्नाच्या चौथ्याच दिवशी आकस्मित मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. अचानक झालेल्या या घटनेने येवला तालुक्यातील हडप सावरगाव येथील कोल्हे आणि कोळम येथील चव्हाण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पूनमवर अंत्यसंस्कार करण्यात आले असून कुटुंबाचा दुःखाचा डोंगर कोसळला असून ही घटना गावातील सर्वांचा हृदय पिळवटून टाकणारा होता. नवरी मुलीच्या अंगावरील हळद फिटली नव्हती त्यातच ही दुर्दैवी घटना घडल्याने दोन्ही कुटुंब शोकसागरात बुडाले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790