नाशिकसह 4 ठिकाणी मल्टी मोडल लॉजिस्टिक पार्क; नितीन गडकरींची घोषणा

👉 Ad: Office On Rent At Canada Corner. Whatsapp For More Details.

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकमध्ये लॉजिस्टिक पार्कसाठी आडगाव-म्हसरूळ भागात 64 एकर जागा शोधण्यात येत आहे.

त्यात 50 एकर जागेवर ट्रक टर्मिनल उभारण्यात येणार आहे.

नाशिकमध्ये मल्टी मोडल लॉजिस्टिक पार्क साकारणार असल्याची घोषणा अखेर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईत केली आहे.

नाशिकसोबतच मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि दिघी बंद येथेही हे पार्क साकारले जाणार आहे. नितीन गडकरी ऑक्टोबर महिन्यात नाशिक दौऱ्यावर आले होते. त्यावेळेसच त्यांनी या पार्कबाबतचे सूतोवाच केले होते. महापालिकेने या प्रकल्पासाठी पुढाकार घेतला तर मदत करण्याची ग्वाही दिली होती.

हे ही वाचा:  नाशिक: कणगा आर्ट फाउंडेशनतर्फे तरुणाईच्या चित्रांचे प्रदर्शन

लॉजिस्टिक पार्क म्हणजे काय?:
लॉजिस्टिक पार्कची प्रामुख्याने औद्योगिक वसाहतीमध्ये गरज असते. कंपन्यांची उत्पादने ठेवण्यासाठी या पार्कचा उपयोग होतो. पार्कमध्ये फ्रेट स्टेशन, साठवणूक, वितरण, उत्पादनांचे ग्रेडिंग, कार्गो अशा सुविधा मिळतात. लॉजिस्टिक हबमध्ये ट्रक टर्मिनल्स, कूलिंग, प्लॅन्ट, वर्कशॉप, होलसेल मॉल चेन तयार केली जाईल. त्यामुळे शहरात होणारी वाहतूक आपसूक कमी होईल. त्यामुळे शहरांचे प्रदूषणही कमी होण्यास मदत मिळणार आहे.

हे ही वाचा:  नाशिक लोकसभा मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत इतके टक्के मतदान

आडगाव-म्हसरूळमध्ये जागा:
नाशिकमध्ये लॉजिस्टिक पार्कसाठी आडगाव-म्हसरूळ भागात जागेचा शोध सुरू आहे. या भागात एकूण 64 एकर जागा शोधण्यात येत आहे. त्यात 50 एकर जागेवर ट्रक टर्मिनल उभारण्यात येणार आहे. विशेषतः सुरत-चेन्नई महामार्गालगत ट्रक टर्मिनिलसाठी जागेचा शोध सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी मिळकत व नगररचना विभागाने जागा देण्यासाठी आवाहन करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच या जागेचा शोध संपल्यानंतर हे काम मार्गी लागेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group