तुमच्या व्यवसायाची जाहिरात करा फुकट.. इथे क्लिक करा..
नाशिक (प्रतिनिधी): सिडकोतील उपेंद्रनगर रस्त्यावरील बांधकाम सुरू असलेल्या हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
हॉटेल चालकाच्या बेजबाबदारपणामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
हॉटेल चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. हयाप्रकरणी अंबड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
याबाबतचे वृत्त असे की, अंबड लिंकरोड येथील हॉटेल एक्सलेन्सी इनचे बांधकाम सुरू आहे. याठिकाणी बांधकाम सुरू असताना येथे येणाऱ्यांसाठी कुठलाही सुरक्षिततेच्या उपाय केलेला नाही. शनिवारी रात्री या हॉटेलमध्ये विनोद गीते (३०, रा. सिडको) हा नातेवाइकांसोबत आला होता. हॉटेल पाहत असताना तो दुसऱ्या मजल्यावरून खाली सिमेंटच्या मलब्यावर साचलेल्या पाण्यात पडला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अंबड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
गेल्या ५ दिवसांपूर्वी हॉटेल एक्सलेन्सी इनच्या बांधकामाचे पाणी थेट पालिकेच्या नाल्यात विनापरवाना सोडले आहे. यामुळे नाले तुंबून ते पाणी संपूर्ण रस्त्यावर वाहत आहे. याबाबत सिडको विभागातील बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती. मात्र त्यावर कारवाई न केल्याने बांधकाम विभाावर संताप व्यक्त करण्यात येत असून ही कारवाई मनपाने केली असती तर या युवकाचा बळी गेला नसता असा आरोप नागरिक करीत आहेत. याप्रकरणी पालिका आयुक्तांनी चौकशी करावी अशी मागणी होत आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक: “मेरी गाडी को कट क्यू मारा” असं म्हणत आधी मारहाण आणि मग लूट..
भूमाफिया रम्मी राजपूतच्या नावाने उद्योजकाकडे मागितली खंडणी