नाशिकला अनधिकृत गॅस भरणा अड्ड्यावर पोलिसांचा छापा

नाशिकला अनधिकृत गॅस भरणा अड्ड्यावर पोलिसांचा छापा

नाशिक (प्रतिनिधी): अनधिकृतरीत्या वाहनांमध्ये घरगुती गॅस भरणा करणाऱ्या अड्ड्यावर भद्रकाली पोलिसांनी छापा मारला.

गॅस भरणा करण्यासाठी वापरण्यात येणारे दोन यंत्र, रिकाम्या गॅस सिलिंडर टाक्या आणि एक रिक्षा, असा सुमारे १ लाख ७० हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला.

तिगरानिया रोड परिसरात पत्र्याच्या शेडमध्ये वाहनांमध्ये अनधिकृतरीत्या घरगुती गॅस भरणा करून देण्याचे काम सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी निंबाळकर यांना मिळाली.

हे ही वाचा:  नाशिक: सोन्याचं मंगळसूत्र केलं परत; महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा !

त्यांनी उपनिरीक्षक डी. वाय. पवार यांना कारवाईच्या सूचना दिल्या. त्यांनी धान्य वितरण अधिकारी अनिता खैरनार यांना संबंधित कारवाई करण्यासंदर्भात पत्र दिले. श्री. पवार, श्रीमती. खैरनार, पोलिस कर्मचारी उत्तम पाटील, श्री. जगदाळे, श्री. राठोड यांनी प्रत्यक्ष खात्री करत छापा मारला.

त्याठिकाणी संशयित साहिल बिलाल पठाण ( २४, रा. अमरधाम रोड) रिक्षामध्ये (एमएच- १५- एफयु- ०७०९) अनधिकृतरीत्या घरगुती गॅस भरणा करताना आढळून आला. त्यास ताब्यात घेण्यात आले. चौकशी केली असता गुलाम आयुब पठाण याचा अड्डा असल्याचे सांगितले. दरम्यान, पठाण घटनास्थळी हजर झाला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. घटनास्थळावरून दोन इलेक्ट्रिक यंत्र, २१ भरलेल्या गॅस सिलिंडर टाक्या, १ अर्धवट भरलेली गॅस टाकी, १० रिकाम्या गॅस सिलिंडरच्या टाक्या, २ वजन काटे आणि एक गॅस भरण्यासाठी आलेली रिक्षा, असा १ लाख ७० हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हे ही वाचा:  नाशिक: सोन्याचं मंगळसूत्र केलं परत; महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा !

पोलिस नाईक उत्तम पाटील यांच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलिस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. दोघा संशयितांना बुधवारी (ता.२४) दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790