नाशिकरोड: सेन्ट्रल जेल मध्ये दोन कैद्यांचा आत्महत्येचा प्रयत्न
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या कारागृहामध्ये दोन कैद्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलंय.
विजयकुमार रॉय आणि सागर जाधव असे या दोन कैद्यांची नावे आहेत.
सागर जाधव याच्यावर निफाड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे.
विजय कुमार रॉय याने 26 ऑक्टोबर २०२१ रोजी स्वतःवर वार करून तर सागर जाधव याने 21 ऑक्टोबर २०२१ रोजी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रकार ऑक्टोबर महिन्यात घडला असला तरी चौकशीअंती ७ जानेवारी २०२२ रोजी नाशिकरोड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कारागृहात साप्ताहिक संचार फेरी सुरु होती, यादरम्यान शिक्षाबंदी विजयकुमार आनंदकुमार रॉय (सी-८१८९) याने अरेरावीने वागण्यास सुरुवात केली. ‘तुम मेरे को क्यू तकलीफ दे रहे हो, मेरे को शांती से यहा रहने दो’, असे म्हणत खिशात लपवून आणलेला पत्र्याचा तुकडा काढला. या पत्र्याने त्याने स्वतःच्या डाव्या हातावर वार केले तसेच बरगडीवरही दुखापत करून घेतली. कारागृहातील कर्मचारी प्रवीण विश्वनाथ विभांडीक यांच्या फिर्यादी नुसार विजयकुमार रॉय याच्याविरुद्ध कलम ३०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर सागर राहुल जाधव (वय २३) हा कारागृहातील मंडल क्रमांक ७ च्या यार्ड सर्कल क्रमांक ५ मध्ये असलेल्या झाडावर चढून झाडाला दोरी बांधून आत्महत्या करण्याचा प्रयन्त करत होता. याप्रकरणी कारागृह शिपाई बिस्मिल्ला शब्बीर तडवी यांच्या फिर्यादी नुसार सागर जाधव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निफाड पोलिस ठाण्यात सागर जाधव याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे.
दोघही कैद्यांविरुद्ध नाशिक रोड पोलीस ठाण्यात कलाम 309 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास नाशिक रोड पोलीस करत आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
धक्कादायक: पहिल्या पत्नीपासून असलेल्या मुलीला फाशी देऊन मारण्याचा प्रयत्न