नाशिकरोड: रजेवर गेलेला कैदी फरार; सेन्ट्रल जेलमध्ये भोगत होता शिक्षा…
नाशिक (प्रतिनिधी): येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेला एक कैदी रजेवर गेला असता तो पुन्हा कारागृहात परतलाच नसल्याने सदरचा कैदी फरार झाला असून याप्रकरणी कारागृह प्रशासनाने नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे…
याबाबत अधिक माहिती अशी की, मध्यवर्ती कारागृहात प्रकाश कांतीलाल पंचाळ हा कैदी गेल्या काही दिवसापासून शिक्षा भोगत होता.
सदरचा कैदी हा दि. ३० एप्रिल २०२१ रोजी एक महिन्याच्या सुट्टीवर गेला असता त्याची सुट्टी १६ मे २०२१ रोजी संपली होती. मात्र, त्यानंतर तो कारागृहात परतला नाही. दरम्यान, तब्बल एक वर्ष त्याचा शोध घेतला असता तो कुठेही आढळून आला नाही. त्यामुळे तो फरार झाला असल्याचे कारागृह प्रशासनाच्या लक्षात येताच प्रशासनाच्या वतीने इम्रान हमीद सय्यद यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जी एम काकड करत आहे.