नाशिकमध्ये पाइपलाइनने गॅसपुरवठा होणार थेट घरापर्यंत !

नाशिक (प्रतिनिधी) : मुंबई नंतर आता नाशिकमध्ये देखील घरापर्यंत थेट पाइपलाइनने गॅसपुरवठा करण्याची योजना राबवण्यात येणार आहे. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात ३५ किलोमीटरची पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. तर, पुढच्या आठवड्यापासून या योजनेच्या कामाला सुरुवात होणार आहे.

या योजनेचे कामकाज महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून सुरु करण्यात आले आहे. त्यानुसार, पालघरच्या प्रकल्पामधून, पाईपलाईनच्या माध्यमातून थेट नाशिक येथे गॅसपुरवठा केला जाणार आहे. दरम्यान, गॅसचा साठा करण्यासाठी विल्होळी येथे स्टेशन उभारले जाणार आहे. नाशिक महापालिकेला कंपनीकडून, पाइपलाइनच्या कामामुळे रोड डॅमेज चार्जेस ८ कोटी देखील  देण्यात आले आहेत. कंपनीकडून जेलरोड व शिंदे, पळसे तसेच पाथर्डी फाटा या ठिकाणी सीएनजी पंपाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. तर, शहराच्या ज्या भागात खडीकरण व डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे, ते काम कंपनीने लवकरात लवकर सुरु करावे. असे निर्देश महापालिकेकडून देण्यात आले आहेत. तसेच महापालिकेच्या जागेत शहर बससेवेसाठी ५ सीएनजी पंप उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे मनपाच्या शहर बससेवेसाठी भविष्यात इंधनाचा प्रश्न सुटणार आहे.

Loading

तुम्ही नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन केला आहे का ?

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790