नाशिकमध्ये डेंग्यू आणि चिकुनगुन्याचे रूग वाढले; धूरफवारणी थंडावली

नाशिकमध्ये डेंग्यू आणि चिकुनगुन्याचे रूग वाढले; धूरफवारणी थंडावली

नाशिक (प्रतिनिधी): महिनाभरातच डेंग्यूचे १८५ तर चिकुनगुन्याचे १४८ नवे बाधित रुग्ण आढळले असून पावसाळ्यामध्ये महापालिकेकडून व्यवस्थित औषध व धूरफवारणी होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. आतापर्यंत डेंग्यूचे २६६ तर चिकुनगुन्याची रुग्णसंख्या २३३ वर पोहोचली असून पालिकेच्या रेकॉर्डवर कमी रुग्ण असले तरी प्रत्यक्षात खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या आठ ते दहापट असल्याचे बोलले जात आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यामुळे पालिकेच्या वैद्यकीय विभागाला काहीसा दिलासा मिळाला असतानाच आता डेंग्यू, चिकुनगुन्यासारख्या कीटकजन्य आजारांच्या साथीने डोकेवर काढल्यामुळे नाशिककर धास्तावले आहेत. पावसाळा सुरू झाल्याने डबक्यांमध्ये पाणी साचून डासांची पैदास होत असून पालिकेकडून कागदोपत्री कारवाई होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. डेंग्यू, चिकुनगुन्याचे सर्वप्रथम सिडकोतील दत्तनगर व सातपूरमधील श्रमिकनगर,गंगापूर गाव या भागात रुग्ण आढळल्याने डास निर्मूलनाची मोहीम राबविली.

हे ही वाचा:  नाशिक: सोन्याचं मंगळसूत्र केलं परत; महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा !

मात्र त्यानंतर डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुन्या यासारख्या कीटकजन्य आजारांचे रुग्ण शहरभर आढळून येत आहेत. सिडको, सातपूरसह पूर्व, पश्चिम, पंचवटी आणि नाशिकरोड भागातही चिकुनगुन्या व डेंग्यूचे रुग्ण आढळले असून सरकारी रेकॉर्डवर रुग्णसंख्या कमी आहे. मात्र, प्रत्यक्षात खासगी रुग्णालयांमध्ये दोन्ही आजारांशी संबंधित लक्षण असलेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. खासगी रुग्णालयात संबंधित रुग्ण आढळल्यास पालिकेकडे त्याची माहिती कळवणे गरजेचे असले तरी खासगी रुग्णालयांकडून मात्र तशी दक्षता घेतली जात नसताना पालिकेचा वैद्यकीय विभाग झोपून आहे. दरम्यान, जानेवारी ते मेपर्यंत शहरात डेंग्यूचे ४१ रुग्ण आढळले होते. मात्र, एकट्या जून महिन्यात डेंग्यूचे ४० रुग्ण वाढले असून जुलैच्या गेल्या महिनाभरातच डेंग्यूचे १८५ नवे रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या आता २६६ पर्यंत गेली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: सोन्याचं मंगळसूत्र केलं परत; महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा !

चिकुनगुन्याचे जूनपर्यंत शहरात ८५ रुग्ण होते. परंतु, जुलैच्या महिनाभरातच त्यात १४८ रुग्णांची भर पडली. त्यामुळे शहरातील चिकुनगुन्याच्या रुग्णांची संख्या २३३ वर पोहाेचली आहे. डेंग्यू कक्षात या रुग्णांना किमान महिनाभर सांधेदुखी तसेच अशक्तपणा तसेच हातापायाला सूज येणे याचा सामना करावा लागत आहे.
या श्रावणात तरी ब्रह्मगिरी प्रदक्षिणेस परवानगी मिळणार का ? जाणून घ्या…
ऑनलाईन गेममुळे नुकसान; 13 वर्षीय मुलाची आत्महत्या, सुसाईट नोट वाचून पाणावतील डोळे

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790