नाशिकमधील ‘या’ तीन खासगी शाळा बंद करण्याचा निर्णय: पालकांची फसवणूक

नाशिकमधील ‘या’ तीन खासगी शाळा बंद करण्याचा निर्णय: पालकांची फसवणूक

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकमधील बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या तीन खासगी शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शासनाची अनुमती नसतांनाही बेकायदेशीरपणे शाळा सुरु ठेऊन विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक करणाऱ्या शाळांच्या शोधमोहिमेत आढळून आलेल्या सोळापैकी तेरा शाळांनी महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे कागदपत्रे सुपूर्द केली आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: सोन्याचं मंगळसूत्र केलं परत; महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा !

मात्र, तीन शाळांकडे कागदपत्रेच नसल्याने त्या बंद करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

गेल्या महिन्यात राज्य सरकारच्या आदेशान्वये संपूर्ण राज्यात बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या शाळांची शोधमोहीम राबविण्यात आली.

त्यात शासनाकडे नाममात्र पत्र देऊन थेट शाळा सुरु करण्याचे अनेक प्रकार उघडकीस आल्याने अशा शाळांच्या संस्थाचालकांवर कारवाई तसेच शाळा बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. कागदपत्रांची छाननी व खात्री करून शासनाला अहवाल पाठविण्याची तयारी सुरु असली तरी वडाळा गावातील खैरूल बनायते इंग्लिश मिडीयम स्कूल, नाशिकरोड-जेलरोड येथील एमराल्ड हाईटस इंटरनॅशनल स्कूल, व चुंचाळे येथील वंश राजे हिंदी माध्यमिक शाळा अशा तीनही शाळांनी कोणतीही कागदपत्रे सदर केली नाहीत. त्यामुळे या शाळा बंद करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती मनपा शिक्षणाधिकारी सुनिता धनगर यांनी दिली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790