नाशिकच्या म्हसरूळ प्रकरणाला धक्कादायक वळण; संचालकाकडून इतर पाच मुलींवरही अत्याचार

नाशिकच्या म्हसरूळ प्रकरणाला धक्कादायक वळण; संचालकाकडून इतर पाच मुलींवरही अत्याचार

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या म्हसरुळ परिसरातील ज्ञानपीठ आधार आश्रमात तीन दिवसांपूर्वी एका विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर हर्षल मोरेला अटक करण्यात आली होती. याप्रकरणी आता धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.

नाशिकच्या म्हसरुळ प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. आश्रमाचा संचालक संशयित हर्षल मोरेने तब्बल पाच अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.

या घटनेने खळबळ उडाली असून नाशिकमध्ये नेमकं चाललंय काय? असा प्रश्न या निमित्ताने सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे.

हे ही वाचा:  नाशिकमध्ये चार दिवस पावसाचा अंदाज; विदर्भ, जळगावला उष्णतेची लाट...

एका आश्रम संचालकाने आश्रमातील एकूण सहा अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. तीन दिवसांपूर्वीच या प्रकरणी एका पीडितेने तक्रार दिली होती. पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर आणखी अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याचं समोर आलेलं आहे.

नाशिक येथील म्हसरुळ परिसरातील ज्ञानपीठ आधार आश्रमात हा प्रकार घडला आहे. या आश्रमाचा संचालक हर्षल मोरे याने हे घृणास्पद कृत्य केलंय. त्याच्यावर म्हसरुळ पोलिस ठाण्यात बलात्कारासह पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

तीन दिवसांपूर्वी एका विद्यार्थीनेने हर्षल मोरेविरोधात तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर मोरेला पोलिसांनी अटक केली. यानंतर पोलिसांनी आश्रमातील इतर विद्यार्थीनींचे जबाब नोंदवले. आणखी पाच अल्पवयीन मुलींसोबत असाच प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी १५ मुलींचे जबाब नोंदवले होते. पीडित सहा मुलींपैकी पाच अल्पवयीन आहेत. या मुलींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून फोटो सोशल मीडियावर केले व्हायरल

यातील एका मुलीवर एका मुलीवर ग्रामीण भागात तर पाच मुलींवर आश्रमातच अत्याचार करण्यात आले असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

दरम्यान पाचही पिडित मुलींची वैद्यकिय तपासणीही करण्यात आली असून त्यांचे अहवाल शनिवारपर्यंत पोलिसांना प्राप्त झालेले नव्हते. मुलींच्या जबाबानुसार हात पाय दाबायचे आहे, असे सांगून मुलींना बोलावले जायचे आणि कोणाला सांगितल्यास बदनामी करेल आश्रमातून काढून टाकेल अशी धमकी द्यायचा आणि अत्याचार करायचा, असे मुलींनी जबाबात म्हटल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान घटनेवरून नाशिक शहरातील मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून खऱ्या अर्थाने शहरातील आश्रमांचे ऑडिट करण्याची वेळ आल्याचे दिसते आहे.

हे ही वाचा:  नाशिक: हायवा डंपर चोरणाऱ्या आरोपीस मध्यप्रदेशातून अटक

पोलिसांना हर्षल मोरेला न्यायालयासमोर सादर केले. कोर्टाने बुधवारपर्यंत या संशयित आरोपीला पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याच्याविरुद्ध पोक्सो आणि बलात्कारासह ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group