नाशिकच्या MG Road वरील या दुकानाला मोठी आग..
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील एमजीरोडवरील जाधव मार्केटच्या पाठीमागे असलेल्या राहुल ट्रेडर्स या दुकानामध्ये शॉर्टसर्किट होऊन मोठी आग लागली होती. गुरुवारी (दि. १९ ऑगस्ट) सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. आग लागल्याचे समजताच अग्निशमन दलाला फोन करण्यात आला आणि अग्निशमन दलाचे बंबही तितक्याच तत्परतेने आले. यावेळी अग्निशमन दलाचे सहा बंब घटनास्थळी दाखल झाले आणि, जवानांकडून आग नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू होते. पावसाच्या संततधारेमुळे आग विझवताना अडचणी निर्माण होत होत्या. त्याचप्रमाणे या भागामध्ये धुराचे लोटही मोठ्या प्रमाणावर दिसून येत होते. जाधव मार्केट परिसरामध्ये व्यापारी संकुल आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. १९ ऑगस्ट) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू