नाशिककरांनो 01 डिसेंबरपासून पुन्हा हेल्मेटसक्ती; कारवाई पुन्हा जोर धरणार !

नाशिककरांनो 01 डिसेंबरपासून पुन्हा हेल्मेटसक्ती; कारवाई पुन्हा जोर धरणार !

नाशिक (प्रतिनिधी): हेल्मेट सक्तीची मोहीम तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्या बदलीनंतर थंडावली होती. आता पुन्हा शहरात 1 डिसेंबर पासून दुचाकीचालकांना हेल्मेट बंधनकारक करण्यात आले आहे.

हेल्मेट परिधान न केल्यास मोटर वाहन कायद्यानूसार पाचशे रुपये दंडही आकारला जाऊ शकतो.

शहरात एक डिसेंबर पासून शहरात हेल्मेट न वापरणार विरुद्ध दंडात्मक कारवाईची मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा:  नाशिकरोड परिसरात एकाच दिवशी तीन घरफोड्या; सुमारे पाच लाखांचा ऐवज लंपास

येत्या काही दिवसात शहर पोलिसांकडून पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारला जाणार असून त्यासाठी दुचाकी चालकांना एका आठवड्याची मुदत शहर पोलिसांकडून देण्यात आली आहे.

नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील तत्कालीन पोलीस आयुक्त पांडे यांनी रस्ता सुरक्षा दृष्टीने हेल्मेट वापरा संबंधी जनप्रबोधनपर अभियान राबवत मागील वर्षी नो हेल्मेट नो पेट्रोलचा आदेश काढला होता. त्यासाठी भरारी पथकांची ही नियुक्ती केली होती. तसेच शहरात ‘हेल्मेट नाही तर पेट्रोल नाही’ असेही प्रयोग राबवण्यात आला होता. हा प्रयोग काही अंशी वादात सापडला होता. त्यानंतर नाशिक शहरातील शासकीय आस्थापना, रुग्णालये, शाळा, महाविद्यालयात ‘हेल्मेट नाही तर सहकार्य नाही’ हा प्रयोग नंतर राबवण्यात आला. मात्र पांडे यांच्या बदलीनंतर हे अभियान बाजूला पडले.

हे ही वाचा:  नाशिक: लॅपटॉपसह दुचाकीचोर पोलिसांच्या तावडीत; क्राईम ब्रांच युनिट १ ची कारवाई !

दरम्यान पोलिसांच्या माहितीनुसार यंदाच्या वर्षी हेल्मेट न घातल्यामुळे आजपावेतो 83 दुचाकीस्वारांचा मृत्यू तर 261 जण गंभीर जखमी झाल्याची पोलिसांकडे नोंद करण्यात आली आहे. तसं बघितलं तर माजी पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या काळात नाशिक मधील हेल्मेट सक्तीचा मुद्दा हा राज्यभर चर्चेत राहिला होता मात्र त्यांच्या बदलीनंतर ही मोहीम थंडावली होती, आता पुन्हा या मोहिमेला नाशिककर कसा प्रतिसाद देणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group