![](http://nashikcalling.com/wp-content/uploads/2022/02/follow.png)
नाशिककरांनो महत्वाची बातमी: शहरातील विविध मार्गांवर प्रवेश बंद, नो पार्किंग
नाशिक (प्रतिनिधी): स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्यांचे आणि भूमिगत विद्युतवाहिनी टाकण्याची कामे सुरू असल्याने मालवीय चौक ते रामकुंड रस्त्यावर तसेच इतर मार्गांत बदल केला आहे.
या मार्गांवर १४ एप्रिल ते १२ जूनपर्यंत असे ९० दिवस ‘नो पार्किंग झोन’ राहील, असे पोलिस प्रशासनाच्या अधिसूचनेत म्हटले आहे.
यानुसार शालिमार ते गंजमाळ, शांता पार्क ते काँग्रेस भवन मार्गावर नो पार्किंग झोन, रहाणे गिरणी ते इक्बाल हॉटेल मार्गावर एकेरी वाहतूक, इक्बाल हॉटेलकडून राहणे गिरणीकडे प्रवेश बंद.
या मार्गावरील वाहनांनी बडी दर्गा ते शिवाजी चौक ते बुधा हलवाई हॉटेल तसेच इतर पर्यायी मार्गाचा वापर करावा. दोन्ही बाजूकडील रस्त्यावर नो पार्किंग झोन राहील.
रविवार कारंजा ते गाडगे महाराज पुलाकडे मेनरोडने जाण्यासाठी एकेरी वाहतूक, गाडगे महाराज पुतळ्याकडून रविवार कारंजाकडे प्रवेश बंद राहील. पर्यायी मार्ग गाडगे महाराज पुतळ्याकडून मेनरोड, रविवार कारंजाकडे जाण्यासाठी शालिमार, नेहरू गार्डन, सांगली बँक सिग्नल, वकीलवाडीमार्गे तसेच मेहर सिग्नल, अशोकस्तंभ मार्ग. या मार्गावर नो पार्किंग झोन राहील. राहणे गिरणी ते पिंजारघाटकडे एकेरी वाहतूक. पिंजारघाटाकडून रहाणे गिरणीकडे प्रवेश बंद. बडी दर्गा ते शिवाजी चौक ते बुधा हलवाई तसेच इतर पर्यायी मार्ग.
[wpna_related_articles title=”More Important News” ids=”10461,10459,10449″]
चांदवडकर आइस फॅक्टरी ते रेडक्राॅसपर्यंत नो पार्किंग झोन. मालवीय चौक ते काट्या मारुती चौक प्रवेश बंद. पर्यायी मार्ग मालवीय चौकाकडून मारुती चौक ते निमाणी बसस्थानक, काट्या मारुती चौक ते नागचौक मार्गाचा वापर करावा. नो पार्किंग झोन असणार आहे. निमाणी बस स्टँण्ड ते पंचवटी कारंजा मार्गावर ‘नो पार्किंग झोन’ राहील.