नाशिककरांना हुडहुडी; नाशिकमध्ये तापमानाचा पारा इतका घसरला

नाशिक (प्रतिनिधी): राज्यभरात थंडीचा परिणाम दिसून येत आहे.

नाशिक शहरात आज सकाळी 6.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.

थंडीच्या कडाक्यानं नाशिककरांना हुडहुडी भरली आहे.

तुम्ही नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन केला आहे का ?

या हंगामातील सर्वांत निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. मनमाड, मालेगावसह नाशिकच्या ग्रामीण भागात थंडीसोबत धुक्याची लाट पसरल्याचं चित्र आहे. निफाडचा पारा घसरून आला 5.5 अंशावर आला आहे तर मनमाडमध्ये 10, मालेगावात 9 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. थंडी आणि धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. थंडीचा सर्वात जास्त फटका द्राक्षे बागांना बसला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.

हे ही वाचा:  उपराष्ट्रपती धनखड यांच्या हस्ते होणार राज्यातील 434 आयटीआय मध्ये संविधान मंदिराचे उद्घाटन !

शनिवारी आणि रविवारी राज्यात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला. त्यामुळे राज्यभरातली तापमानात मोठी घसरण झाली. मुंबईतही अवकाळी पावसानं हजेरी लावली. त्यामुळे मुंबईतल्या तापमानातही मोठी घसरण झालेली पाहायला मिळाली. शहरातल्या अनेक भागात किमान तापमान 16 अंशांवर पोहोचलं. येत्या एक ते दोन दिवसांत मुंबईत थंडीचा प्रभाव असणार असल्याचं हवामान तज्ज्ञांनी सांगितलं आहे. मुंबईत 16 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

हे ही वाचा:  जुन्या नाशकात सिलिंडर स्फोटात घर खाक; आग विझवताना अग्निशमनचे ३ जवान जखमी

राज्यातल्या अनेक भागातील कमाल तापमानात मोठी घसरण झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील तापमानात पारा पुन्हा घसरला आहे. सपाटी भागात तापमान 07 ते 08 डिग्री सेल्सिअस पर्यत घसरले. आज सातपुडा पर्वत रागांमधील डाब भागात पुन्हा दवबिंदु गोठले आहेत. यामुळे गवतांवर बर्फाच्छादीत चादर पसरल्याचं चित्र दिसून आलं.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790