नाशिक मध्ये पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या
नाशिक (प्रतिनिधी): पत्नीची हत्या करून पतीने स्वतः आत्महत्या केल्याची घटना अंबड येथील चुंचाळे शिवारात घडली.
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत आणि तिचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीने तिचा खून करून स्वतः गळफास घेतला.
याबाबत अधिक माहिती अशी की भुजंग अश्रू तायडे (वय 35 राहणार घरकुल योजना चुंचाळे अंबड नाशिक ) याचे आज पत्नी मनीषा भुजंग तायडे वय 25 सोबत वाद झाले.
या वादात भुजंगने मनीषावर धारदार शस्त्राने वार करत तिचा निर्घृण खून केला. त्यानंतर त्याने स्वतः घराच्या किचन मधील छताच्या हुकाला गळफास लावून आत्महत्या केली.
याप्रकरणी पोलिसांनी दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज पत्की हे पोलीस पथकासह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.