नव्या आर्थिक वर्षात सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; आजपासून ‘या’ गोष्टी महागणार

नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

नव्या आर्थिक वर्षात सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; आजपासून ‘या’ गोष्टी महागणार

नाशिक (प्रतिनिधी): आजपासून नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात होत आहे. असे असतांना आजपासून अनेक नवीन नियम लागू होणार असल्याने सर्वसामान्यांचा खिसा कापला जाणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी ही मोठी बातमी. आजपासून सुरु होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षात तुमचं बजेट बिघडणार आहे.

आजपासून अनेक नवीन नियम लागू होणार आहे. आजपासून सहा अंकी हॉलमार्क क्रमांक नसेल तर सोन्याचे दागिने तुम्ही विकू शकणार नाही. तर विमा पॉलिसीवरही कर लागू होणार आहे. नवे नियम लागू होणार असल्यानं गाड्यांच्या किंमतीही वाढणार आहेत.

आजपासून काय काय महागणार?:
दरम्यान, सीएनजी, पीएनजीच्या किंमतींतही बदल होण्याची शक्यता आहे. यासोबत टोल महागला आहे. तसेच औषधंही महागणार आहेत. तर शेअर बाजार, इन्कम टॅक्स आणि गुंतवणुकीच्या अनेक नियमांत बदल झालेत. त्यामुळे तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे. तसेच आर्थिक गणित कोलमडणार असल्याने खर्चावर नियंत्रण ठेवावे लागणार आहे. आजपासून चांदी, पितळ, सिगारेट, सोने, प्लॅटिनम,आयात केलेले दरवाजे, खेळणी, सायकल, इलेक्ट्रिक किचन चिमणी महागणार आहे. तर आजपासून मोबाईल फोन, इलेक्ट्रिक वाहने, टेलिव्हिजन संच, बॅटरी, कॅमेरा लेन्स, कॅमेरा स्वस्त होणार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790