नवसपूर्ती करून परतणाऱ्या भाविकांच्या टेम्पोला अपघात; ४ जणांचा मृत्यू; १५ जखमी

nashik calling

नवसपूर्ती करून परतणाऱ्या भाविकांच्या टेम्पोला अपघात; ४ जणांचा मृत्यू; १५ जखमी

नाशिक (प्रतिनिधी): नवसपूर्तीचा कार्यक्रम आटोपून घरी परतणार्‍या भाविकांच्या टेम्पोला अपघात झाला आहे.

मालेगाव-चाळीसगाव रस्त्यावर गिगाव फाट्यालगत रविवारी (दि. ६ मार्च २०२२) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

अपघातात एक महिलेसह चार भाविक ठार झाले असून 15 जण जखमी झाले आहेत.

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अधिक माहिती अशी की, मुंदखेडे, ता. चाळीसगाव येथील पोपट महादू पाटील यांच्या नातूचा नवसपुर्तीचा कार्यक्रम रविवारी श्रीक्षेत्र चंदनपुरी येथे खंडोबा महाराजाच्या मंदिरात होता. या कार्यक्रमकरिता पाटील यांनी एका टेम्पोत (407 टेम्पो क्र. एम.एच.-19-बी.एम.-0102) सर्व भाविकांना चंदपुरी येथे आणले होते.

नवसपूर्तीचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्वांचे जेवण झाल्यानंतर सर्व भाविक परतीच्या प्रवासाला निघाले होते. मालेगाव चाळीसगाव रस्त्यावर असलेल्या गिगाव फाट्याजवळ टेम्पो आला असता रस्त्यावरील गतिरोधकावर गाडी उधळली. उंच गतिरोधक आणि गाडीचा वेग जास्त असल्याने गाडीने पलटी मारली. त्यामुळे गाडीतील भाविक एकमेकांवर पडले. यात 15 भाविक जखमी झाले तर एक महिलेसह चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. 

टेम्पोत बसलेल्या भाविकांमध्ये लिलाबाई पोपट पाटील (65), कांतीलाल पोपट पाटील (50), बन्सीलाल राघो पाटील (45) व आबाजी जालम पाटील (60) हे जागीच ठार झाले तर 15 पेक्षा अधिक भाविक गंभीररित्या जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे, एपीआय हेमंत पाटील, उपनिरीक्षक विशाल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर तालुका पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group