नगरसेविका पती कन्नू ताजनेंना न्यायालयाचा ५० हजार रुपये दंड
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकरोड येथील कोविड सेंटरची तो’ड’फो’ड करणारे नगरसेविका पती राजेंद्र (कन्नू) ताजने यांनी न्यायालयाने ठोठावलेला ५० हजार रुपयांचा दंड अखेर भरला. ५० हजारांचा धनादेश त्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱी अर्जुन कुऱ्हाडे यांच्याकडे गुरुवारी (दि.९) सुपूर्द केला आहे.
नाशिकरोड येथील मनपाच्या कोरोना केअर सेंटरमध्ये पुरेशा सुविधा नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या होत्या. स्टाफकडून अपेक्षित सहकार्यही केले जात नसून रुग्णांकडे लक्षही दिले जात नसल्याचे रुग्णांच्या नातेवाइकांकडून भाजपच्या नगरसेविका सीमा ताजने यांच्याकडे तक्रारी येत होत्या. शिवाय त्यापूर्वीच याच कोविड सेंटरमध्ये दाखल असलेले त्यांच्या सासऱ्यांचेही कोरोनाने नि’ध’न झाले होते. या बाबींच्या पार्श्वभूमीवर सीमा ताजने याचे पती राजेंद्र ऊर्फ कन्नू ताजने यांनी सेंटरमध्ये पुरेशा सुविधा मिळत नसल्याने थेट आपली कारच या कोविड सेंटरमध्ये घुसवित तो’ड’फो’ड केली होती. त्याविरोधात तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर आता न्यायालयानेही ताजने यांना दंड ठोठावला आहे. न्यायालयाच्या आदेशानेच ताजने यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागात ५० हजार रुपयांचा धनादेश जमा केला आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
अभिमानास्पद: ऑक्सिजन निर्मितीत राज्यात नाशिकचा पहिला क्रमांक!
नाशिक: सराफावर ह’ल्ला करणाऱ्या टोळीतील दोघांना अटक
खू’न खटल्यातील फरार बंदिवान २३ वर्षांनी गुजरातमधून अटक
पंचवटी: तडीपार गुन्हेगारच निघाला मोबाइल चोर!