नाशिक: नंदिनी नदीचे प्रदूषण करणाऱ्यांवर आता ६२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनच्या प्रयत्नांना यश

नाशिक (प्रतिनिधी): प्रदूषण रोखण्यासाठी उंटवाडीतील दोंदे पूल ते गोविंदनगरपर्यंत नंदिनी नदीच्या दोन्ही किनारी ६२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याला महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी मंजुरी दिली आहे.

यामुळे नंदिनीला संरक्षक कवच प्राप्त झाले असून, कचरा टाकण्यास प्रतिबंध बसणार आहे. आयुक्तांच्या मंजुरीचे पत्र स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना देण्यात आले आहे. शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनच्या पाठपुराव्याला यामुळे यश आले आहे.

नंदिनी नदीत परिसरातील रहिवाशी मोठ्या प्रमाणात घाण व कचरा टाकतात, कोंबड्यांचे मांसही टाकले जाते. मोठ्या प्रमाणात वाळू उपसाही होतो, अतिक्रमणही होते. याला प्रतिबंध बसावा, नंदिनीचे अस्तित्व जपले जावे यासाठी उंटवाडीतील दोंदे पूल ते गोविंदनगरपर्यंत नदीच्या दोन्ही काठांवर सीसीटीव्ही बसवावेत, अशी मागणी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्या पुढाकाराने करण्यात आली होती. याबाबतचे निवेदन ७ व ९ डिसेंबर २०२१ रोजी महापालिका आयुक्त कैलास जाधव, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांना देण्यात आले होते.

हे ही वाचा:  नाशिक: टवाळखोरांचा धुडगूस; कारची काच फोडून दोघांची केली लुटमार

त्याची दखल घेवून महापालिकेने सर्व्हे करून सीसीटीव्हीसाठी ६२ ठिकाणे निश्चित केली. त्यास आयुक्त कैलास जाधव यांनी १६ मार्च २०२२ रोजी मंजुरी दिली. त्याबाबतचे पत्र व नकाशे स्मार्ट सिटीला पर्यावरण विभागाने दिले आहे. सीसीटीव्ही बसविण्याची कार्यवाही लवकरात लवकर करण्यात येईल, असे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांनी सत्कार्य फाउंडेशनला कळविले आहे.

सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवलताई खैरनार, संगिता देशमुख, रवींद्र सोनजे, प्रभाकर खैरनार, संजय टकले, संध्या छाया ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव देवरे, उपाध्यक्ष शोभाताई सावकार, सचिव मनोहर पाटील, सहसचिव राधाकृष्ण जाधव, कोषाध्यक्ष सखाराम देवरे, सदस्य चिंतामण सावकार, गुलाबराव शिंदे, बापुराव पाटील, हिरालाल ठाकुर, सुजाता येवलेकर, दिलीप खोडके, गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विजय डोंगरे, सचिव ओमप्रकाश शर्मा, उपाध्यक्षा स्नेहलता सोनवणे, सल्लागार भालचंद्र रत्नपारखी, संचालक बाळासाहेब देशमुख, अशोक पालवे, सुधाकर तोरणे, साधना नागापूरकर, विनोद पोळ, दिलीप दिवाणे, नीलेश ठाकूर, यशवंत जाधव, मनोज वाणी, श्रीकांत नाईक, शीतल गवळी, चित्रा रौंदळ, उज्ज्वला सोनजे, सुनिता उबाळे, वंदना पाटील, मीना टकले, सुजाता काळे, ज्योत्स्ना पाटील, भारती चौधरी, संध्या बोराडे, दिपाली सोनजे, माया पुजारी, रूपाली मुसळे, श्रुती पिल्ले, वृषाली खैरनार, सुलोचना पांडव, शुभांगी शिसोदे, पल्लवी रनाळकर, नीलिमा चौधरी, सरीता पाटील, कांचन महाजन, रेखा भालेराव, डॉ. शशिकांत मोरे, डॉ. राजाराम चोपडे, डॉ. सुनील चौधरी, बाळासाहेब दिंडे, राजेंद्र कानडे, मनोज पाटील, मंदार सडेकर, अशोक पाटील, शैलेश महाजन, किरण काळे, हरिष काळे, दीपक दुट्टे, आशुतोष तिडके, नितीन तिडके, पोपट तिडके, संजय तिडके, बाळासाहेब राऊतराय, वैभव कुलकर्णी, राहुल काळे, मगन तलवार, पुरुषोत्तम शिरोडे, तेजस अमृतकर, सचिन राणे, संकेत गायकवाड (देशमुख), प्रथमेश पाटील, कुणाल महाजन, बन्सीलाल पाटील, तुषार मोरे, सचिन जाधव आदींसह गोविंदनगर, बाजीरावनगर, सद्गुरूनगर, खोडे मळा, काशिकोनगर, कर्मयोगीनगर, तिडकेनगर, जगतापनगर, कालिका पार्क, सुंदरबन कॉलनी, पाटीलनगर, जुने सिडको, खांडे मळा आदी परिसरातील रहिवाशांनी महापालिका आणि स्मार्ट सिटीच्या अधिकार्‍यांचे आभार मानले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group