धक्कादायक: निमाणी बस स्टॅन्डवर सिटी लिंक बसमध्ये बसलेल्या महिलेचा विनयभंग
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकला सिटी लिंक बसमध्ये बसलेल्या महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली आहे.
याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाचे म्हणजे संशयित आरोपीने सिटी लिंक बसचा गणवेश परिधान केला होता.
त्यामुळे सदर संशयित आरोपी हा सिटी लिंक बसचा कर्मचारी आहे का हा प्रश्न सुद्धा उभा राहत आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, २१ मे २०२२ रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास निमाणी बस स्टॅन्ड येथे फिर्यादी ह्या सिटी लिंक बसमध्ये बसल्या होत्या. त्यावेळी बसच्या बाहेरून सिटी लिंक बसचा गणवेश परिधान केलेल्या एका व्यक्तीने त्याच्या मोबाईलमध्ये फिर्यादी महिलेचा फोटो घेतला.
- नाशिक: पतीने भिशीसाठी पत्नीकडे मागितले पैसे… पत्नीने पतीसोबत केलं धक्कादायक कृत्य…
- नाशिक: बहिणीच्या लग्नाच्या 2 दिवस आधीच भावाचा दुर्दैवी मृत्यू
- नाशिक: पाण्याची मोटार चालू करतांना शॉक लागून महिलेचा मृत्यू
ही बाब सदर महिलेला लक्षात येताच तिने याबाबत संशयित व्यक्तीला याचा जाब विचारला. त्याचा मोबाईल आपल्या हातात घेऊन पाहत असतांना संशयित आरोपीने मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी संशयित आरोपीने महिलेचा हात पकडला आणि महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग केला. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी किशोर संपत तारगे (वय: २१) याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. तर पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कासर्ले करत आहेत.