धक्कादायक: नाशिक शहरात शाळेबाहेर दहावीच्या विद्यार्थ्यावर टोळक्याचा कोयत्याने हल्ला

नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

धक्कादायक: नाशिक शहरात शाळेबाहेर दहावीच्या विद्यार्थ्यावर टोळक्याचा कोयत्याने हल्ला

नाशिक (प्रतिनिधी): पुणे शहरानंतर नाशिकमध्ये कोयता गँगची दहशत असून दिवसाआड कोयता गँगच्या घटना घडत आहेत. यात अल्पवयीन मुलांपासून ते सराईत गुन्हेगारांपर्यत सर्रास प्राणघातक हल्ले केले जात आहेत.

अशातच एका कोयता गँगने चक्क शाळेतल्या मुलावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना नाशिक शहरातील म्हसरूळ भागात उघडकीस आली आहे.

नाशिक शहरात ज्या पद्धतीने गुन्हेगारी घडत आहे, त्यावरून शहरात पोलिसांचा धाकच उरला नसल्याचे चित्र आहे. राजरोसपणे हल्ला, मारहाण, गोळीबार, खून अशा घटना घडत आहेत. त्यामुळे सामान्य नागरिक भीतीच्या सावटाखाली आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: गंभीर गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या संशयिताला बेड्या !

नाशिक: अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या

म्हसरूळ भागात एका शाळकरी मुलावर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना घडली आहे. आज अनेक केंद्रावर दहावीचा पेपर होता. दुपारी दोन वाजता हा पेपर सुटल्यानंतर संबंधित विद्यार्थी मित्रांसोबत घरी जात असताना ही घटना घडली. अचानक काही तरुणांनी विद्यार्थ्यांवर कोयत्याने वार करत पळ काढल्याचे विद्यार्थ्यांसह पालकांनी सांगितले.

⚡ हे ही वाचा:  मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू; नाशिक जिल्ह्यात गुरुवारपर्यंत ‘यलो अलर्ट’

या घटनेत संबंधित विद्यार्थ्यास दुखापत झाली असून उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र याबाबत अद्याप पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झालेला नाही. मात्र या घटनेने पालकवर्गामध्ये चिंतेचे वातावरण असून अशाप्रकारे सराईत गुन्हेगारांबरोबरच आता अल्पवयीन मुले देखील हल्ला, मारहाण या घटनांमध्ये सहभागी होत असल्याचे दिसून येत आहे.

नाशिक: ट्रक उलटून झालेल्या अपघातात 21 भाविक जखमी

प्राथमिक माहितीनुसार शहरातील दिंडोरी रोडवरील विद्यालयाबाहर  ही घटना घडली आहे. येथील दहावीचा विद्यार्थी हा पेपर सुरु असल्याने शाळेत गेला होता. पेपर सुटल्यावर त्याच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला. यामध्ये तो किरकोळ जखमी झाला आहे. काही दिवसांपूर्वी संशयित आणि संबंधित विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला होता. याचा राग मनात धरून संशयित मुलांनी इतर काही मुलाना बोलवून विद्यार्थ्यांवर हल्ला चढवल्याचे जखमी विद्यार्थ्याने सांगितले. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शाळकरी मुलावर देखील आता कोयत्यांना हल्ला होत असल्याने पालकांनी चिंता व्यक्त केली आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here