धक्कादायक: नाशिकमध्ये प्राणायाम करताना 30 वर्षीय महिलेचा मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): थंडीच्या दिवसांमध्ये सध्या प्रत्येक जण व्यायाम करण्याकडे लक्ष देत असतो.
काही जण व्यायाम शाळेत जातात तर काही जण घरीच योगा आणि प्राणायाम करत असतात.
पण, नाशिकमध्ये प्राणायाम करत असताना एका 30 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील मखमलाबाद परिसरात ही घटना घडली आहे. सोनल आव्हाड असं या महिलेचं नाव आहे. सोनल आव्हाड (वय: ३०) या नेहमीप्रमाणे आज सकाळी प्राणायाम करत होत्या. प्राणायाम करत असताना त्यांच्या छातीत दुखू लागले. काही कळायच्या आता त्या जमिनीवर कोसळल्या. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
सोनल यांचा मृत्यू निमोनिया आणि फुफुसाच्या आजाराने झाल्याचं शवविच्छेदन अहवालात समोर आलं आहे. फुफ्फुसाचा आजार असलेल्या किंवा चुकीच्या पद्धतीने प्राणायाम केल्यास असा मृत्यू ओढावू शकतो असंही डॉक्टरांनी म्हटलं आहे. नेहमी हसतमुख असणारया सोनलला आज प्राणायाम करता करता आपला जीव गमवावा लागलाय. सोनाली यांच्या मृत्यूमुळे आव्हाड कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
Breaking News: नाशिकमध्ये ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला!
नाशिकच्या सायबर विभागाचं यश: ऑनलाइन गंडविलेले 40 हजार महिलेला परत
आर्मीचा गणवेश घालून शिरला आर्टिलरी कॅम्पमध्ये; नाशिकमध्ये एकाला अटक!
नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. ३० डिसेंबर २०२१) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू