धक्कादायक! नाशिक सेन्ट्रल जेलमध्ये कैद्याकडून जेल गार्डला मारहाण
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांकडून एका जेल गार्डला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
या हल्ल्यात जेल गार्ड गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहामध्ये काही दिवसांपूर्वी संबंधित कैद्याला आणले होते. पुण्याच्या येरवडा तुरुंगात हा कैदी 302 च्या गुन्ह्याखाली शिक्षा भोगत आहे.
संबंधित कैद्यास दुसऱ्या बॅरेक मध्ये जाण्यास बंदी केल्याने त्याने बुधवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास जेल गार्डवर हल्ला केला.
- महत्वाची बातमी: संपूर्ण नाशिक शहरात या दिवशी पाणीपुरवठा नाही..
- नाशिक: आईने गेम खेळण्यासाठी मोबाईल दिला नाही म्हणून १२ वर्षाच्या मुलाची आत्महत्या
प्रभू चरण पाटील असे या जेल गार्डचे नाव आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास कैद्यांची तपासणी सुरु असताना संबंधित कैदी दुसऱ्या बॅरेक जात असल्याचे पोलीस कर्मचाऱ्याच्या लक्षात आले. यावेळी जेल गार्डने त्यास हटकले असता त्याने जेल गार्डला मारहाण करण्यास सुरवात केली.
त्यानंतर संबंधित कैद्याच्या इतर दहा ते बारा मित्र बंदीवानांनी जेल गार्डला मारहाण करण्यास सुरवात केली. यावेळी दहा ते बारा जणांच्या घोळक्याने दगड आणि लाथा बुक्यांनी मारहाण केल्याने जेल गार्ड गंभीर जखमी झाला.घटनेची माहिती मिळताच कारागृहातील इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमीस तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या या जेल गार्डवर उपचार सुरु असल्याची माहिती सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाने दिली आहे.