धक्कादायक! नाशिकनंतर सप्तशृंगी गडावरही बर्निंग बसचा थरार

धक्कादायक! नाशिकनंतर सप्तशृंगी गडावरही बर्निंग बसचा थरार

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक येथे खासगी बसला पहाटे भीषण आग लागल्याची घटना झालेली असतांना दुपारी बारा वाजेच्या दरम्यान श्री सप्तशृंगी गड येथे ग्रामपंचायत टोलनाक्याच्या जवळ महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसला शॉर्टसर्किटमुळे आग लागली.

एसटी बस पिंपळगाव बसवंत डेपोची होती. (बस क्रमांक एम एच १४ बीटी ३७५२) प्रसंगावधान राखून चालक आणि वाहक यांनी सर्व प्रवाशांना खाली उतरवले. यात्रा नियंत्रण समितीने तातडीने तेथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक स्वयंसेवक, विश्वस्त संस्थेचे सुरक्षा कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ, रोप वे कर्मचारी आदी यांना तातडीने घटनास्थळी पाचारण करून फायर एक्स्टिंविशर द्वारे तातडीने आग विझविली.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिकमध्ये बस पेटली; पहाटे प्रवासी गाढ झोपेत असतानाच काळाचा घाला, नक्की काय घडलं?
नाशिकमध्ये इडलीवाला निघाला ‘बंडलबाज’, तब्बल पाच लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group