धक्कादायक: आपली चोरी लपविण्यासाठी अपहरण करून 9 वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या

नाशिक (प्रतिनिधी): एका नऊ वर्षांच्या मुलाचे अपहरण करून गळा दाबून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यातील सामनगाव रोडवर गाडेकर मळ्यात समोर आली आहे. आपण केलेल्या चोरीची कुठे वाच्यता होऊ नये या भीतीने या मुलाच्या शेजारीच राहणाऱ्या तरुणाने हे कृत्य केल्याचे तपासाअंती समोर आले आहे.

पोलिसांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.  रामजी लालबाबू यादव (वय 9) असं मृत मुलाचे नाव आहे. मंगळवारपासून रामजी लालबाबू यादव बेपत्ता होता. यादव कुटुंबीयांनी त्याचा अनेक ठिकाणी शोध घेतला पण तो सापडला नाही. मंगळवारी दुपारी शेजारी राहणार्‍या तरुणाने आपल्या मुलगा रामजीला बरोबर नेल्याचे पालकांनी पाहिले होते. त्यानंतर तरुण रात्री एकच्या सुमारास घरी आल्यानंतर मुलाच्या पालकांनी रामजीबद्दल तरुणाकडे चौकशी केली. मात्र त्यावेळी या तरुणाने  उडवाउडवीची उत्तरे दिली.

हे ही वाचा:  नाशिक: चिमुकल्याने गिळली विक्सची डबी; श्वास गुदमरला; डॉक्टर देवदूत ठरले, प्राण वाचवले !

एकूणच त्याचा संशय आल्याने पालकांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख, वरिष्ठ पोलीस निरिक्षक सूरज बिजली यांच्यासह गुन्हे शाखेचे अधिकारी व पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांनी संशयित तरुणाला ताब्यात घेतले. पोलिसांनी जेव्हा त्यांच्याकडे विचारणी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं दिली. पण, पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली.

हे ही वाचा:  नाशिक: चिमुकल्याने गिळली विक्सची डबी; श्वास गुदमरला; डॉक्टर देवदूत ठरले, प्राण वाचवले !

या तरुणाने काही दिवसांपूर्वी एका प्रवाशाला सिन्नर इथं सोडतो म्हणून गाडीत बसवले होते. त्यानंतर काही अंतर दूर गेल्यावर त्याने प्रवाशाकडून मोबाइल फोन आणि 4 हजार रुपये लुटले होते. हा सर्व प्रकार मृत रामजी यादव या चिमुरड्याने पाहिला होता. आपण केलेली लूट कुणाला सांगू नको, अशी धमकी या तरुणाने या चिमुरड्याला दिली होती. पण,  चिमुरडा कुठे तरी वाच्यात करेल या भीतीने  चिमुरड्याला बाहेर फिरायला घेऊन जातो सांगून डुबेरे गावातील बंधार्‍यावर घेऊन गेला आणि  गळा दाबून त्याचा खून केला.

हे ही वाचा:  नाशिक: चिमुकल्याने गिळली विक्सची डबी; श्वास गुदमरला; डॉक्टर देवदूत ठरले, प्राण वाचवले !

आरोपी तरुणाने घटनास्थळाची माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळावर पोहोचून पोलिसांनी पंचनामा केला आणि मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणी आरोपी तरुणाविरोधात  गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सूरज बिजली यांनी सांगितले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790