नाशिक (प्रतिनिधी) : यावर्षी दिवाळीचा उत्सव वेगळ्या परिस्थितीत आपण साजरा करत आहोत. कारण संपूर्ण देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला होता. गेले 15 दिवस कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होवून रुग्ण कमी होण्याचे चित्र दिलासादायक आहे. पंरतु भविष्यातील धोके टाळून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी यंदाची दिवाळी नागरिकांनी सार्वजनिक स्वरुपात साजरी न करता मर्यादित स्वरुपात साजरी करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नागरिकांना केली आहे.
विभागीय आयुक्त गमे म्हणाले, दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मोठ्याप्रमाणावर लोक खरेदीसाठी बाहेर पडतात. कुठलीही काळजी न बाजारात जर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली मास्क, सॅनिटायर्झचा वापर केला नसेल तर पुन्हा प्रादुर्भाव वाढण्याचा मोठा धोका आहे. उत्सव कालावधीत ज्येष्ठ नागरिक तसेच लहान बालके यांनी घराबाहेत पडण्याचे टाळावे. तसेच या काळात वेगवेगळ्या स्वरुपाचे सार्वजनिक कार्यक्रम घेतले जातात. त्यामध्ये पाडवा पहाट, दिवाळी पहाट कार्यक्रम यंदा कोरोनाचा पार्श्वभूमीवर घेण्यात येणार नसून कार्यक्रम आयोजित करायचे असतील तर ते ऑनलाईन, केबन नेटवर्क, फेसबुक इत्यादी माध्यमांद्वारे प्रसारण करावे अशी माहिती गमे यांनी दिली.
वायुप्रदुषण टाळण्यासाठी फटाकेबंदी
वायु व ध्वनी प्रदुषण रोखण्यासाठी फटाके वाजविणे यावर्षी टाळावे लागणार आहे. कारण याचा परिणाम फक्त माणसावरच नाही तर प्राण्यांवरही होत असतो. तसेच कोरोना होवून गेलेल्या रुग्णांच्या फप्पुसावर कमी अधिक प्रमाणात परिणाम झालेला आहे. इतरही दम्याच्या रुग्ण आहेत ज्यांना श्वासोच्छश्वास घेण्यास ज्यांना त्रास होतो त्यांना फटाकाच्या धुरामुळे फार मोठा त्रास होवून प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांनी फटाके यावर्षी वाजवू नये. हा उत्सव मर्यादित स्वरुपात आपल्या नातेवाईकामध्ये व घरात साजरा करावा मोठ्या प्रमाणात जी काही सुरक्षा घेणे आवश्यक आहे ती सर्व सुरक्षा घेवून हा उत्सव साजरा करावा, असे आवाहन विभागीय आयुक्त श्री. गमे यांनी करुन सर्व नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहे.