दारूचा टेम्पो उलटला आणि नको तेच घडलं…

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिकहून ताहाराबाद येथे देशी दारू घेऊन जाणारा टेम्पो उलटल्याने चार जण गंभीर जखमी झाले. तसेच हजारो रुपयांची दारू रस्त्यावर वाहून गेली. गुरुवारी (दि.२९) दुपारच्या सुमारास नाशिकमधल्या विंचूर-प्रकाशा या महामार्गावर हा प्रकार घडला. टेम्पोचे डाव्या बाजूचे टायर फुटल्याने टेम्पो एका बाजूला उलटला. याचा मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक रस्त्यावर आले.

हे ही वाचा:  नाशिक: आईचंच काळीज ते! लेकराचा मृत्यू झाल्याचं कळलं, आईनेही प्राण सोडला

एवढेच नाही तर तळीरामांनी मात्र ही स्वतःहून चालून आलेली सोन्याची संधी सोडली नाही. रस्त्याने येण्या-जाणाऱ्या तळीरामांनी दारूच्या बाटल्या पळवत आपला हात साफ केला.

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790