दागिने पॉलिश करून देतो सांगत मंगळसूत्र घेऊन पलायन

नाशिक (प्रतिनिधी): सोन्याचे दागिने पॉलिश करून देतो असे सांगत दोघा तरुणांनी महिलेच्या गळ्यातील दोन सोन्याचे मंगळसूत्र घेऊन पलायन केले. देवळालीच्या लहवित रोड येथे हा प्रकार घडला आहे.. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: ऑनर किलिंग प्रकरणी सुप्रीम कोर्टात आरोपीला २० वर्षे कारावास

पोलिसांनी दिलेली माहिती व हिराबाई गिते यांच्या तक्रारीनुसार, दुपारी घराच्या अंगणात बसलेल्या असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवर दोन तरुण आले, त्यांनी आम्ही कंपनीची माणसे आहोत. तुमच्या गळ्यातील सोन्याचे दागिने पॉलिश करून देतो, असे सांगत पावडर दाखवली. दागिण्यांवर घाण आहे. पॉलिश केली तर नवीन दिसतील, असे सांगितले. महिलेने एक मंगळसूत्र काढून दिले, दुसरे वाटीत ठेवले. संशयितांनी पाणी आणण्यास सांगितले. महिला घरात पाणी आणण्यास गेली असता संशयितांनी दोन्ही मंगळसूत्र घेऊन पलायन केले. वरिष्ठ निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790