नाशिक: डॉ. सुवर्णा वाजे मृत्यू प्रकरणात अजून एक धक्कादायक खुलासा…

डॉ. सुवर्णा वाजे मृत्यू प्रकरणात अजून एक धक्कादायक खुलासा…

नाशिक (प्रतिनिधी): महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांच्या खुनानंतर त्यांचा मृतदेह सॅनिटायझर टाकून जाळल्याची कबुली संशयित बाळासाहेब ऊर्फ यशवंत रामचंद्र म्हस्के याने दिली.

म्हस्के हा डॉ. वाजेंचा पती संदीप याचा मावसभाऊ आहे.

मात्र खून कसा केला याबाबत त्याने चुप्पी साधल्याने पोलिसांना याप्रकरणी आणखी मेहनत घ्यावी लागणार आहे.

रायगडनगर शिवारात मिलिटरीचे गेट नंबर ३६ च्या समोर कारमध्ये जळालेल्या अवस्थेत डॉ. वाजे यांचा मृतदेह आढळून आला होता. घटनेनंतर वाडीवऱ्हे पोलिसांनी संदीपला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत मावसभाऊ यशवंत म्हस्के याचे नाव पुढे आले होते. घटनास्थळावर सॅनिटायझरची पाच लिटरची कॅन ठेवली होती ती जागा संशयित म्हस्के याने दाखवली आहे. तसेच दुसरी कॅन संदीपच्या गाळ्यात ठेवल्याची कबुलीही त्याने दिली.

हे ही वाचा:  पत्नीच्या अंगावर रॅाकेल ओतून पेटती काडी टाकणा-या नव-याला आजीवन सश्रम कारावासाची शिक्षा

बुधवारी (दि.२३) संशयितांची पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना सहा दिवस म्हणजे २८ फेब्रुवारीपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. डॉ. वाजे यांना पती संदीपने पार्टीचा बहाणा करत तडजोडीसाठी रायगडनगर येथे बोलवले होते. त्याच्यासोबत म्हस्के होता. दोघांचे फोन तासभर बंद होते. या वेळेतच त्यांनी खून केला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अनिल पवार तपास करत आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: पाणीपट्टी दरवाढीला अखेर स्थगिती; अतिरिक्त आयुक्तांनी केली घोषणा !

पोलिसांनी कारमधून चाकू जप्त केला आहे. चाकू आणि सॅनिटायझर कुठून विकत घेतले याची चौकशी आता होणार आहे. संशयित म्हस्केने स्वत:च्या पत्नीला सोडण्यासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ करत तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. अशाचप्रकारे म्हस्केने संदीप यास पत्नी डॉ. सुवर्णा यांचा इतका छळ कर की ती आत्महत्या करेल असा सल्ला दिला होता. मात्र, डॉ. वाजे यांनी पती वाजेच्या छळाला भीक घातली नाही. यातून वाजे याने पत्नीचा खून केला असावा, अशी दाट शक्यता व्यक्त होत आहे.

हे ही वाचा:  नाशिक: आठवीच्या अपहृत विद्यार्थ्याचा खून; वडीवऱ्हे येथे आढळला मृतदेह

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790