डीबीमध्ये अखेर अधिकारी व कर्मचाऱ्यांची अदलाबदल- पोलीस आयुक्तांचा निर्णय !

नाशिक(प्रतिनिधी): नाशिक शहरात  नवीन नियुक्त झालेले पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी आयुक्तातील परिमंडळ १ व २ मधील सर्व १३ पोलिस ठाण्यातील डीबी म्हणजेच गुन्हे शोध पथकामध्ये काही फेरबदल केले आहेत. त्यानुसार डी‌बीमधील अधिकारी व कर्मचारी यांची बदली केली असून‌ त्यांची नेमणूक इतर ठिकाणी पोलिस चौकीत केली आहे. यानिमित्ताने नवीन पोलिस कर्मचाऱ्यांना‌ नवीन संधी प्राप्त झाली आहे.

हे ही वाचा:  नाशिक:  घरूनच टपाली मतदानाची 80 वर्षांवरील मतदारांना सुविधा !

पोलीस आयुक्तांनीच याबाबत आदेश काढल्यामुळे  यासंदर्भात कोणालाही‌ हस्तक्षेप करता येणे शक्य नाही. शहरांमध्ये तेरा पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या कामाबाबत बऱ्याच तक्रारी येत होत्या. तसेच शोध पथकाचे कर्मचारी व अधिकारी वर्षानुवर्ष तेथेच काम करत होते. त्यामुळे काही कर्मचाऱ्यांनी या विभागात जणू स्वतःची मक्तेदारीच प्रस्थापित केली होती. तरी आयुक्त दीपक पांडे यांनी गुन्हे शोध पथकातील या बाबी लक्षात घेता अधिकारी व कर्मचाऱ्यांची उचलबांगडी केली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: म्हसरुळ लिंकरोड परिसरात तडीपार गुंडाला अटक

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790