जिल्ह्यात आजपर्यंत ७९ हजार ७२२ रुग्ण कोरोनामुक्त ; ७ हजार ७० रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक (प्रतिनिधी) : जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज (दि.१७) प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ७९  हजार ७२२ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत ७  हजार ७०  रुग्णांवर उपचार सुरु असलेल्या रुग्णामध्ये ६८२  ने घट झाली आहे.  आत्तापर्यंत १ हजार ५७८  रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

हे ही वाचा:  लोकसभा निवडणुकीत उमेदवार व राजकीय पक्ष यांच्या खर्चावर राहणार निवडणूक आयोगाची नजर

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण :

नाशिक ग्रामीण मध्ये  नाशिक ४७४, चांदवड १३१ , सिन्नर ८८२, दिंडोरी

२७२, निफाड ५९२, देवळा ६०,  नांदगांव २४५, येवला १२६, त्र्यंबकेश्वर १११, सुरगाणा १५, पेठ ३७, कळवण ९६,  बागलाण १९४, इगतपुरी ११९, मालेगांव ग्रामीण २०२  असे एकूण ३ हजार ५५६ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ३  हजार १५३, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात २३५  तर जिल्ह्याबाहेरील १२६ असे एकूण ७  हजार ७० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  ८८  हजार ३७०  रुग्ण आढळून आले आहेत.

हे ही वाचा:  लोकसभा निवडणुकीत उमेदवार व राजकीय पक्ष यांच्या खर्चावर राहणार निवडणूक आयोगाची नजर

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी :

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ८३.५२,  टक्के, नाशिक शहरात ९३.२२ टक्के, मालेगाव मध्ये  ९०.०९  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ७५.१२  टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९०.२१ इतके आहे.

मृत्यु :

नाशिक ग्रामीण ५३६, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  ८३३, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १६३  व जिल्हा बाहेरील ३६  अशा एकूण १ हजार ५७८   रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

हे ही वाचा:  लोकसभा निवडणुकीत उमेदवार व राजकीय पक्ष यांच्या खर्चावर राहणार निवडणूक आयोगाची नजर

(वरील आकडेवारी आज (दि.१७) सकाळी ११.००  वाजता  जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790