नाशिक (प्रतिनिधी) : जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १८ हजार ९३१ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ४ हजार ८३७ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत ६८९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक २८३, चांदवड ६६ , सिन्नर २४६, दिंडोरी, ५१, निफाड २८५, देवळा ७२, नांदगांव १५३, येवला १४, त्र्यंबकेश्वर १९, सुरगाणा ०७, पेठ ०१, कळवण ०४, बागलाण ९८, इगतपुरी ५८, मालेगांव ग्रामीण १०५ असे एकूण १४६२ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २ हजार ८२३, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ५४४ तर जिल्ह्याबाहेरील ०८ असे एकूण ४ हजार ८३७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात २४ हजार ४५७ रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी :
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ७२.२९, टक्के, नाशिक शहरात ८०.३६ टक्के, मालेगाव मध्ये ६७.५८ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८४.४९ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमा ७७.४१ इतके आहे.
कोरोनामुळे आजपर्यंत झालेले मृत्यु :
नाशिक ग्रामीण १७८, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ३९५, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ९५ व जिल्हा बाहेरील २१ अशा एकूण ६८९ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
(वरील आकडेवारी आज (दि. १७ ऑगस्ट) सकाळी ११.०० वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)