नाशिक: चेष्टामस्करीतून झाला वाद, मार लागल्याने एकाचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): चेष्टामस्करीतून झालेल्या वादातून एका इसमाचा मार लागल्याने मृत्यू झाल्याचा प्रकार शिवाजीवाडी येथे उघडकीस आला. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[wpna_related_articles title=”More Important News” ids=”8224,8246,8198″]
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती आणि जया वांगडे (३०, रा. भारतनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पती संतोष वांगाडे (३६) हे रविवारी दुपारी घरातून गेले असता काळूबाईच्या जुन्या घरासमोर संशयित विष्णू किसन पवार (३५, रा. भारतनगर, नाशिक) याने त्याला हटकले व चेष्टा केली. यात पुढे आपापसात वाद झाला. संशयित विष्णूने संतोष वांगडे यास जोराचा धक्का दिल्याने ताे तोल जाऊन जमिनीवर पडला. यावेळी त्याच्या दोक्याला गंभीर मार लागला. जिल्हा रुग्णालयात त्यास दाखल केले असता तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत संशयित विष्णू पवार याला अटक केली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक श्रीवंत करीत आहेत.