चांदवडला देवीचं दर्शन झालं, मात्र नियतीच्या मनात वेगळंच होतं, चिमुकलीसह आईचा बुडून मृत्यू

चांदवडला देवीचं दर्शन झालं, मात्र नियतीच्या मनात वेगळंच होतं, चिमुकलीसह आईचा बुडून मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): देवीच्या दर्शनासाठी आलेल्या माय लेकींसोबत दुर्दैवी घटना घडली आहे. चांदवड तालुक्यातील केद्राई देवीच्या दर्शनानंतर धरणाच्या काठाजवळ असताना पाय घसरून पडल्याने सात महिन्याच्या चिमुरडीसह आईचा मृत्यू झाला आहे.

या घटनेनंतर सनदी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची नोंद वडनेरभैरव पोलिस ठाण्यात झाली आहे. अधिक तपास वडनेरभैरव पोलिस करत आहेत.

नाशिक: कपडे वाळत घालायचं निमित्त झालं, सुखाचा संसार क्षणात मोडला

नुकतीच सिन्नर तालुक्यातील रामपूर परिसरात वीज कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आज नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात खडक ओझर परिसरात दोन्ही माय लेकींचा मृत्यू झाला आहे.

Crime News: नाशिकला कौटुंबिक वादातून टरबूज विक्रेत्याचा कान कापला

येथील केद्राई देवी मंदिर परिसरातील धरणात बुडून त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत वडनेरभैरव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

डोळ्यांदेखत चोरी; ट्रायल घेण्यासाठी दुचाकी घेऊन गेला, तो परत आलाच नाही, नाशिकमधील घटना!

चिमुकलीसह आईनेही जीव गमवला:
चांदवड तालुक्यातील खडक ओझर येथील श्री केद्राई देवीच्या नवसपूर्तीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील नाईकवाडी शाहूनगर येथील वडार समाजाचे नागरिक शुक्रवारी खडक ओझर येथील श्री केद्राई माता मंदिरात नवसपूर्तीसाठी आले होते. यावेळी ज्या सात महिन्यांच्या मुलीबाबत नवस होता, ती तन्वी नीलेश देवकर आणि तिची आई अर्चना नीलेश देवकर यांनी दर्शन घेतले. दर्शन झाल्यानंतर धरणाजवळ गेल्या होत्या. यावेळी आई अर्चना देवकर हिचा पाय घसरून मुलीसोबत धरणात बुडाली.  काही वेळानंतर आजूबाजूचे नागरिक त्या ठिकाणी आले. मात्र, तोपर्यंत वेळ निघून गेली होती.

कुटुंबावर शोककळा पसरली:
दरम्यान पोहता येत नसल्याने त्या दोघी माय लेकींचा करुण अंत झाला आहे. दर्शनासाठी आलेल्या इतर नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच बघ्यांची गर्दीही मोठी झाल्याचे पाहायला मिळाले. स्थानिक नागरिकांनी लागलीच घटनेची माहिती वडनेरभैरवचे सहायक पोलिस निरीक्षक मयूर भामरे यांना दिली. त्यानुसार पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहचले. यावेळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. मात्र या घटनेने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. एकीकडे मुलीच्या निमित्ताने ते सगळे देवीच्या दर्शनासाठी चांदवडला आले होते. मात्र या दुर्दैवी घटनेत सात महिन्यांच्या चिमुकलीसह आईलाही जीव गमवावा लागला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group