शिवसेना, सत्कार्य फाऊंडेशनचे महानगर परिवहन महामंडळाला निवेदन
नाशिक (प्रतिनिधी): विद्यार्थी आणि नागरिकांच्या सोयीसाठी गोविंदनगर, महात्मानगर, गंगापूररोड मार्गे निमाणी अशी चक्री बससेवा सुरू करा, अशी मागणी शिवसेना, सत्कार्य फाऊंडेशनने केली आहे. नाशिक महानगर परिवहन महामंडळाला याबाबतचे निवेदन गुरुवारी, २८ ऑक्टोबर रोजी देण्यात आले आहे.
गोविंदनगर, कर्मयोगीनगर भागातून गंगापूररोड, कॉलेजरोड, निमाणीकडे जाण्या-येण्यासाठी अद्यापही सिटीलिंक बससेवा सुरू करण्यात आलेली नाही. यामुळे विद्यार्थी आणि इतर रहिवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
वरील मार्गावरून चक्री बससेवा सुरू झाल्यास कालिका पार्क, सिटी सेंटर मॉल, महात्मानगर, बाजीरावनगर, सद्गुरूनगर, कर्मयोगीनगर, गोविंदनगर, जगतापनगर, उंटवाडी, जुने सिडको या भागातील नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे.
ही चक्री बससेवा त्वरित सुरू करावी, याबाबतचे निवेदन २८ ऑक्टोबर रोजी महामंडळाचे महाव्यवस्थापक मिलिंद बंड यांना देण्यात आले आहे. शिवसैनिक, सत्कार्य फाऊंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारूशिला गायकवाड (देशमुख), शिवसेना शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, संगिता देशमुख, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, संजय टकले, श्याम अमृतकर, दिलीप दिवाने, विनोद पोळ, मकरंद पुरेकर, श्रीकांत नाईक, कांतीलाल उबाळे, समीर सोनार, उज्ज्वला सोनजे, वंदना पाटील, कांचन महाजन, साधना कुवर, सुनिता उबाळे, ज्योत्स्ना पाटील, तुषार मोरे, बाळासाहेब दिंडे, डॉ. राजाराम चोपडे, डॉ. शशिकांत मोरे, निलेश ठाकूर, दीपक दुट्टे, संदीप महाजन, विजय कांडेकर, मगन तलवार, मनोज वाणी, मनोज पाटील, शैलेश महाजन, प्रथमेश पाटकर, बापू आहेर, पुरुषोत्तम शिरोडे, सचिन राणे, नितीन तिडके, आशुतोष तिडके, अशोक पाटील, सुरेश पाटील, दीपक ढासे, प्रथमेश पाटील, मनोज कोळपकर, संकेत गायकवाड (देशमुख), रितेश वाजपेयी, कैलास भिंगारकर आदींसह रहिवाशांनी ही मागणी केली आहे.