गोविंदनगर, कर्मयोगीनगरमार्गे बससेवा त्वरित सुरु करण्याची मागणी

शिवसेना, सत्कार्य फाऊंडेशनची मागणी

नाशिक (प्रतिनिधी): गोविंदनगर, कर्मयोगीनगरमार्गे बससेवा सुरू करावी, अशी मागणी शिवसेना, सत्कार्य फाऊंडेशनने केली आहे. याबाबतचे निवेदन नाशिक परिवहन महामंडळाला देण्यात आले.

महापालिकेच्या परिवहन महामंडळाची बससेवा काही महिन्यांपूर्वी मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आली. झपाट्याने विकसित होणार्‍या गोविंदनगर, कर्मयोगीनगर या परिसरातून अद्यापही ही सेवा सुरू करण्यात आलेली नाही. यामुळे येथील रहिवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

या दोन्ही मार्गावरून बससेवा सुरू करावी, अशी मागणी सत्कार्य फाऊंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारूशिला गायकवाड (देशमुख) यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील नागरिकांनी केली आहे. याबाबतचे निवेदन नाशिक परिवहन महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी चव्हाणके, महाव्यवस्थापक मिलिंद बंड यांना गुरुवारी, २३ सप्टेंबर रोजी देण्यात आले.

हे ही वाचा:  नाशिक: बनावट शासकीय नियुक्तीपत्र देत गंडा; भामट्याकडून 8 लाखांची फसवणूक

शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, रवींद्र सोनजे, प्रभाकर खैरनार, दिलीप दिवाणे, श्याम अमृतकर, मकरंद पुरेकर, मनोज वाणी, अशोक पाटील, संजय टकले, विनोद पोळ, दीपक दुट्टे, मगन तलवार, साधना कुवर, उज्ज्वला सोनजे, धवल खैरनार, मीना टकले, कांचन महाजन, संगिता देशमुख, सचिन राणे, शैलेश महाजन, आशुतोष तिडके, राहुल काळे, बापू आहेर, ज्ञानेश्वर महाले, बन्सीलाल पाटील, सचिन जाधव, मनोज पाटील, मोहन पाटील, समीर सोनार, प्रशांत अमृतकर, संकेत गायकवाड (देशमुख), प्रथमेश पाटील आदींनी निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: थकबाकीमुळे वीज कनेक्शन तोडलेल्या ग्राहकांसाठी अभय योजनेला मुदतवाढ

गोविंदनगर, कर्मयोगीनगर या मार्गे बससेवा सुरू झाल्यास या भागासह तिडकेनगर, जगतापनगर, प्रियंका पार्क, सद्गुरूनगर, कालिका पार्क, पाटीलनगर, खांडे मळा, हेडगेवारनगर, दत्त मंदिर येथील नागरिकांना सातपूर, अंबड औद्योगिक वसाहत, नाशिकरोड रेल्वे स्थानक, नाशिकरोड, महात्मानगर, कॉलेजरोड, गंगापूररोड, सीबीएस, पंचवटीसह शहराच्या विविध भागात जाणे-येणे सोयीचे होणार आहे.

हे ही वाचा:  नाशिक: आपले सरकार केंद्रांमार्फत लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजाणी करावी- आयुक्त कुलकर्णी

सर्वे करून मार्ग निश्चित करणार:
गोविंदनगर, कर्मयोगीनगर या मार्गावर अद्यापपर्यंत बससेवा कधीही सुरू झालेली नाही. यामुळे या भागाचा सर्वे करून मार्ग निश्चित करण्यात येईल. त्यानंतर या मार्गे बससेवा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे महाव्यवस्थापक मिलिंद बंड यांनी सांगितले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790