गोदा श्रध्दा फाउंडेशनचा सांज पाडवा; नाशिककरांनी अनुभवला सुरांच्या मेजवानीचा आस्वाद

नाशिक (प्रतिनिधी): गेल्या 22 वर्षांपासून विविध नामांकित गायकांच्या सुरेल आवाजाची नाशिककरांना अनुभूती देऊन त्यांची दिवाळी आठवणीची करणाऱ्या नाशिकच्या गोदा श्रध्दा फाउंडेशन तर्फे  यावर्षीची दिवाळी देखील अशीच सुरांच्या मेजवानीचा आस्वाद घेणारी ठरली निमित्त होते ते प्रख्यात गायिका बेला शेंडे व साथीदारांसोबत नाशिककरांनी साजरा केलेला सांज पाडव्याचे.

नाशिकच्या  बॉइज टाऊन स्कुल ग्राऊंड येथे आयोजित केलेल्या या सांज पाडवा मध्ये यावर्षी गायिका  बेला शेंडे तसेच गायक  विश्वजीत बोरवणकर व राहुल खरे त्यांच्या सुरेल आवाजाने उपस्थित मंत्रमुग्ध झाले.

हे ही वाचा:  नाशिक: चारित्र्यावर संशय; सासरच्या जाचास कंटाळून विवाहितेची आत्महत्या

या उपक्रमाबाबत सांगताना गोदा श्रद्धा फाउंडेशनचे सुरेश अण्णाजी पाटील म्हणाले की “गेल्या दोन दशकांहून अधिक कालावधीपासून गोदा श्रद्धा फाउंडेशन तर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असून याआधीच्या वर्षात गोदा श्रद्धा फाउंडेशन तर्फे आयोजित कार्यक्रमांमध्ये सुरेश वाडकर, स्वप्नील बांदोडकर, आदर्श शिंदे, कार्तिकी गायकवाड, रोहित राऊत, कविता राम, अभिजीत कोसंबी, प्रसंजीत कोसंबी, उत्तरा केळकर, अरुण दाते, आनंदी जोशी, विजय गटलेवार, ज्ञानेश्वर मेश्राम, मुग्धा वैशंपायन, अजित कडकडे, सावनी रवींद्र, जितेंद्र तुपे, स्वप्नील गोडबोले व विश्वजा जाधव अश्या नामांकित गायक गायिकांनी नाशिककरांना सुरेल गीतांची मेजवानी दिली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: महापालिका आयुक्तपदी राहुल कर्डिले !

सूर निरागस हो, ऐसी लागी लगन, तीर्थ विठ्ठल, मला वेड लागले प्रेमाचे ,अप्सरा आली अशी विविध भक्ती गीत ,सुगम गीत ,अभंग ,गवळण अशा विविध प्रकारची गीते यावेळी सादर करण्यात आली . अधोक्षक कराड़े याने आपल्या बहरदार सूत्र संचालनाने कार्यक्रमात वेगळीच रंगत भरली.

हे ही वाचा:  नाशिक: "घटस्फोट पाहिजे असेल तर ५३ लाख रुपये द्या"; सासरच्या मंडळींविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल...

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, महानगरपालिका आयुक्त चंद्रकांत पूलकुंडवार,एड. नितीन ठाकरे, लक्ष्मण सावजी, महेश हिरे, डॉ.सयाजी गायकवाड, एड. दिलीप वनारसे, संजय करंजकर, नानासाहेब महाले, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, मुन्ना हिरे शिवाजी गांगुर्डे, दत्ता पाटील, अरविंद कारे, एड. श्याम बडदे, नेमीचंद पोद्दार, एड. सुबोध शहा व कृणाल पाटील हे मान्यवर उपस्थित होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790