नाशिक (प्रतिनिधी) : इंदिरानगर परिसरातील भगवती गॅस एजन्सीमधील कर्मचाऱ्याने ग्राहकांकडून वसूल केलेली आठ लाख रूपयांची उधारी परस्पर लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार भगवती गॅस एजन्सीमध्ये काम करणारा पुष्कर विजय पाटील याने अल्पवधीत मालका सोबत चांगल्या प्रकार विश्वास संपादन केला. एजन्सीद्वारे घरगुती आणि हॉटेल वापरासाठी गॅस सिलेंडर पुरवला जातो. त्याच्या उधारी वसुलीची मालकाने मोठ्या विश्वासाने त्याच्यावर कामगिरी सोपवली होती. याचाच गैर फायदा घेत संशयित पुष्कर पाटील याने १ नोव्हेंबर २०१९ ते २९ जून २०२० या कालावधीतील ग्राहकांकडून सात लाख ९० हजार ५४७ रुपयांची रक्कम वसूल केली. आणि ही वसूल केलेली रक्कम एजन्सीत न देता परस्पर लंपास केली. हा प्रकार एजन्सी मालक लक्ष्मण मंडाले यांच्या लक्षात आल्याने त्यांनी इंदिरा नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी पोलिसांनी फसवणुकीचं गुन्हा दाखल केला आहे. आणि संशयित पुष्कर पाटील यास पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला १७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.