गंगापूर रोड: महिलेचे मंगळसूत्र ओढून चोरट्यांचा पोबारा

गंगापूर रोड: महिलेचे मंगळसूत्र ओढून चोरट्यांचा पोबारा

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकमध्ये दिवसेंदिवस चैन स्नॅचिंग च्या घटनांमध्ये पुन्हा एकदा वाढ होत असल्याचे दिसून येत आहे,गंगापूररोड भागात काल सायंकाळ चा सुमारास मधुर स्वीटस सावरकर नगर येथे एका महिलेचा गळ्यातील मंगळसूत्र ओरबडून नेल्याची घटना समोर आता आली आहे.

शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजे चा सुमारास कल्पना राजेंद्र क्षीरसागर आणि त्यांचे पती राजेंद्र क्षीरसागर हे दोघे गुरू पोर्णिमे निमित्त स्वामी समर्थ केंद्रातून दर्शन घेऊन पायी घरी जात असताना त्यांच्यावर पाळत ठेवणारे दोन अज्ञात दुचाकी स्वार आले अणि मागे बसलेल्या अज्ञात इसमाने कल्पना क्षीरसागर या वृद्ध महिलेच्या गळ्यातील 28 ग्राम वजनाची पोत ओरबडली आणि नरसिंह नगरच्या मार्गने पसार झाले. .क्षीरसागर यांनी आरडा ओरड केली मात्र कोणीही धावून न आल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले व गंगापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी येऊन माहिती घेत याबाबत तपास सुरू केला आहे तर गंगापूर पोलीस ठाण्यात सदर घटनेचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे….

Loading

हे ही वाचा:  नाशिक: भद्रकालीत मोबाईल दुकान फोडणाऱ्या दोघांना अटक

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790