नाशिक (प्रतिनिधी): कोरोनामुळे लॉकडाउन झाल्यानंतर शाळा महाविद्यालये बंद झाली. मुलांच्या अभ्यासक्रमावर काय करायचे म्हणून शासनाने शाळा महाविद्यालयांना ऑनलाईन क्लास घेण्यास सांगितले. मागील काही महिन्यांपासून सुरळीत अभ्यासक्रम सुरु होता.
परंतु आता शाळांनी विद्यार्थ्यांकडून फी ची मागणी करायला सुरुवात केली. ज्या विद्यार्थ्यांनी मागील सात आठ महिन्यात फी भरली नाही त्या विद्यार्थ्यांचे पुढील ७ दिवसांत ऑनलाईन शिक्षण बंद करण्याचा निर्णय नाशिक स्कूल असोसिएशनने घेतला आहे. परंतु कोणत्याही विद्यार्थ्यांचा दाखल काढून टाकण्यात येणार नाही हेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या संदर्भात शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांना निवेदन देण्यात आले आहे.
शाळा ऑनलाईन होत असल्या तरी त्यांचा जास्त फायदा विद्यार्थ्यांना होताना दिसत नाहीये. खाजगी शाळा नियमित क्लास घेताय पण विद्यार्थी काही ना काही कारण काढून दांडी मारताना दिसतात. किंवा मुलांना कलासला बसायला कंटाळा येतो. असे सांगून पालकांकडून तक्रारी येत आहेत. यातच आता हा फीचा मुद्दा वादग्रस्त ठरत आहे. परंतु शाळांना देखील आपले व्यवस्थापन सांभाळण्यासाठी व शिक्षकांचे पगार करण्यासाठी पैशांची गरज आहे म्हणून आता शाळांनी फी मागण्यास सुरुवात केली आहे.