नाशिक (प्रतिनिधी) : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये बेड्स फुल झाल्यानंतर खाजगी रुग्णालयांमध्ये सुद्धा रुग्ण वाढू लागले. त्यानंतर खाजगी रुग्णालयांमध्ये जादा बिल आकारले जात असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या होत्या. त्यामुळे महापालिकेने लेखापरीक्षकांना नियुक्त करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी १३२ लेखापरीक्षक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णालयातील एकूण बेड्सच्या ८० टक्के बेड्स साठी शासनाने निर्धारित केलेल्या शुल्कानुसार खासगी रुग्णालयांकडून बिल आकारले जात आहे की नाही हे तपासण्याची जबाबदारी या लेखापरीक्षकांवर आहे. रुग्णालयामध्ये रुग्णांना बिले देण्यापूर्वी ते लेखापरीक्षकांकडून तपासून मगच देण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शासनाने निर्धारित केलेल्या दरांप्रमाणे बिलांची आकारणी नसेल तर संबंधित रुग्णालयावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे लिखापरीक्षक रुग्णालयात गैरहजर असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाणार आहे. आणि लेखापरीक्षकांना त्यांचा रोजचा अहवाल मुख्य लेखापरीक्षकांना सादर करावा लागणार आहे