किराणा दुकानाला लागलेल्या आगीत आई आणि मुलगा भाजले..; दुकान जळून खाक
नाशिक (प्रतिनिधी): किराणा दुकानाला लागलेल्या आगीत आई आणि मुलगा भाजल्याची घटना घडली आहे.
इगतपुरी तालुक्यातील निनावी येथे किराणा दुकानाला आग लागल्याची घटना घडली आहे.
या घटनेत दुकान चालक आणि त्याची आई भाजल्या आहेत.
अधिक माहिती अशी की, निनावी येथे नामदेव गायकवाड यांच्या किराणा दुकान आहे.
दुकान शेजारी एक गाळा सुद्धा आहे. नामदेव यांच्या घराचे बांधकाम चालू असल्याने शेजारच्या गाळ्यात घरात उपयोगी वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. आणि याच गळ्यात नामदेव आणि त्याचे कुटुंब राहत होते. मात्र आज सकाळी (4 मार्च) रोजी सकाळी 6.30 वाजता शॉर्ट सर्किट मुळे दुकानाला आग लागली होती. आग लागली त्यावेळी नामदेव यांची आई दुकाना शेजारील गाळ्यात झोपल्या होत्या. दुकानाच्या दोनही बाजू बंद असल्याने नामदेव यांनी आईला वाचविण्यासाठी दुकानाचे शटर तोडून आता शिरले.
या आगीत दरम्यान नामदेव आणि त्यांची आई 15 ते 20 टक्के भाजल्या आहेत. त्यांना एस एम बी टी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. परिसरात घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक घटना स्थळी आले. सर्वांच्या मदतीनं ही आग विझवण्यात आली. या घटनेत नामदेव यांच्या दुकान जाळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झालं असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.