कालिका पार्क, कर्मयोगीनगर, सद्गुरूनगरमध्ये झळकले दिशादर्शक फलक

कालिका पार्क, कर्मयोगीनगर, सद्गुरूनगरमध्ये झळकले दिशादर्शक फलक

नाशिक (प्रतिनिधी): तिडकेनगर, कर्मयोगीनगर, सद्गुरूनगरसह विविध ठिकाणी महापालिकेने दिशादर्शक फलक उभे केले आहेत. यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

या कामासाठी सतत पाठपुरावा केल्याबद्दल शिवसेना आणि सत्कार्य फाउंडेशनचे आभार मानले जात आहे.

तिडकेनगर, कर्मयोगीनगर, सद्गुरूनगर, बाजीरावनगर, कालिका पार्क, सिटी सेंटर मॉल सिग्नल, दोंदे पूल, जगतापनगर, प्रियंका पार्क, खोडे मळा आदी भागाचा झपाट्याने विकास होत आहे. नवीन वसाहती व इमारतींचा पत्ता नागरिकांना सहज शोधता यावा यासाठी दिशादर्शक फलक लावण्यात यावे, अशी मागणी शिवसैनिक, सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्यासह रहिवाशांनी महापालिकेकडे केली होती.

हे ही वाचा:  नाशिक: आठवीच्या अपहृत विद्यार्थ्याचा खून; वडीवऱ्हे येथे आढळला मृतदेह

याबाबत तत्कालीन शहर अभियंता संजय घुगे यांना ६ ऑक्टोबर २०२१ रोजी निवेदन देण्यात आले होते. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या हस्ते २३ ऑक्टोबर २०२१ रोजी दिशादर्शक फलक बसविण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला होता. सद्गुरूनगर, तसेच तेथील संध्या छाया ज्येष्ठ नागरिक मंडळ विरंगुळा केंद्र, कालिका पार्क, सिटी सेंटर मॉल सिग्नल पूल, गोविंदनगर रस्ता, आर डी सर्कल, छत्रपती राजे संभाजी व्यायामशाळा, नयनतारा इमारतीकडे जाणारा रस्ता आदी ठिकाणी फलक बसविण्याचे काम पूर्ण झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

हे ही वाचा:  Breaking: नाशिक हादरलं…नाशिकमध्ये पुन्हा खून; २ जण पोलिसांच्या ताब्यात

सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), शिवसेना शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, धवलताई खैरनार, संगिता देशमुख, संध्या छाया ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव देवरे, शोभाताई सावकार, मनोहर पाटील, राधाकृष्ण जाधव, सखाराम देवरे, चिंतामण सावकार, गुलाबराव शिंदे, बापुराव पाटील, हिरालाल ठाकुर, सुजाता येवलेकर, दिलीप खोडके, श्रीकांत नाईक, विनोद पोळ, दिलीप दिवाणे, मनोज वाणी, डॉ. शशीकांत मोरे, बाळासाहेब दुसाने, यशवंत जाधव, नीलेश ठाकूर, वैभव कुलकर्णी, बाळासाहेब राऊतराय, मगन तलवार, टी. टी. सोनवणे, सुनीता उबाळे, शीतल गवळी, वंदना पाटील, मीना टकले, प्रतिभा पाटील आदींनी महापालिकेचे आभार मानले आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: मुख्याध्यापिका घरी एकटीच; अचानक टोकाचा निर्णय अन् होत्याचं नव्हतं झालं…

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790