कसारा घाटात तीन वाहनांमध्ये विचित्र अपघात; चार जण जखमी

कसारा घाटात तीन वाहनांमध्ये विचित्र अपघात; चार जण जखमी

नाशिक (प्रतिनिधी): कसारा घाटात ट्रेलर, इर्टीगा आणि ट्रॅव्हल्समध्ये झालेल्या विचित्र अपघातात चार जण जखमी झाले आहेत.

नाशिकच्या मुंबई -आग्रा महामार्गवरील नवीन कसारा घाटात एक विचित्र अपघात घडलाय.

मंगळवारी झालेल्या या अपघातात चार जण जखमी झाले आहेत.

जखमींवर कसारा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हे ही वाचा:  राज्यात ३६ पैकी २१ जिल्ह्यात पारा ४० पार; अजून ३ दिवस उष्णतेची लाट !

अधिक माहिती अशी की,  ट्रेलर नंबर NL 01 AB 9156 हा नाशिकहुन मुंबई च्या दिशेने जात होता. नवीन कसारा घाटात या ट्रेलरचा अचानक ब्रेक फेल झाला. ट्रेलरच्या पुढे चालणाऱ्या इर्टीगा (MH 05DH 6695) गाडीवर ट्रेलर जाऊन धडकला. आणि ही इर्टीगा गाडीच्या पुढे चालणाऱ्या एका ट्रॅव्हल्सवर जाऊन आदळली.

[wpna_related_articles title=”More Important News” ids=”10499,10491,10488″]

हे ही वाचा:  राज्यात ३६ पैकी २१ जिल्ह्यात पारा ४० पार; अजून ३ दिवस उष्णतेची लाट !

या अपघातात ट्रेलर आणि ट्रॅव्हल्स मध्ये इर्टीगा गाडी अडकली होती. इर्टीगा गाडीतील चार जण या अपघातात जखमी झाले आहेत. यातील एकाला गंभीर दुखापत झाली आहे. आर्टिगा गाडीतील सर्व जखमी हे उल्हासनगर येथील आहेत. अपघातानंतर ट्रक चालक पळून गेला आहे. या अपघातात राम सोनी यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून सुषमा सोनी, मीरा लहराणी, अशोक लहराणी हे किरकोळ जखमी झाले आहेत. सर्व जखमींना कसारा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group