कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार ही अफवा?

नाशिक (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांनी जिल्हा परिषद शिक्षण विभागांतर्गत सुरू असलेल्या शाळा बंद करण्याचा कोणताही विचार नाही. तरी यासंदर्भात चुकीची माहिती पसरत असून, ही केवळ अफवा असल्याचे सांगितले आहे.

जिल्ह्यातील २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या सुमारे ३०२ शाळा बंद करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने घेतला आहे.‌ मात्र, या विद्यार्थ्यांना जवळील शाळांमध्ये सामावून घेण्याचे नियोजन देखील करण्यात आले आहे. राज्याच्या शिक्षण विभागानेदेखील या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्याअनुषंगाने म्हसकर यांनी पत्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील गटशिक्षण अधिकाऱ्यांना याबाबत सूचना केल्या आहेत.

तर दुसर्‍या बाजूला शाळा समायोजनाची प्रक्रिया सुरू झाली असून, त्याअंतर्गत जिल्ह्यातील ३०२ तसेच राज्यातील १५ हजार शाळा बंद करण्यात येणार आहे. ही केवळ अफवा आहे, असे म्हसकर म्हणाले.‌ तसेच शिक्षकांमध्ये चुकीचा संदेश पसरला आहे. कमी पटसंख्येच्या शाळांविषयी शासनाने फक्त माहिती मागितली आहे. त्यामुळे शिक्षकांनी घाबरण्याचे कुठलेही कारण नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group