ओझर येथे १७ वर्षीय तरुणाची आत्महत्या !

नाशिक (प्रतिनिधी) : जिल्ह्यात दर पाच ते सहा दिवसांमध्ये तरुणाईच्या आत्महत्येच्या घटना समोर येत आहेत. त्यानुसार, ओझर येथील एका १७ वर्षीय युवकाने घरात कोणीच उपस्थित नसतांना गळफास घेऊन जीवन संपवले. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

रविवारी (दि.३ जानेवारी) रोजी ओझर येथील नारखेडे चाळीत राहणाऱ्या अभिषेक मच्छिंद्र निकम (वय १७) याने राहत्या घरी गळफास घेत जीवन संपवले. अभिषेकची आई माहेरी गेली होती. तर, वडील नोकरीस गेले होते. रात्री ९ वाजेच्या सुमारास अभिषेकचे वडील कामावरून घरी परतले असता, त्यांनी दार ठोठावले. मात्र, दार कोणीच उघडले नाही. म्हणून, त्यांनी घराच्या पाठीमागील बाजूने जाऊन दार उघडले. दरम्यान, त्यांना अभिषेकने गळफास घेतल्याचे निर्दशनास आले. अभिषेक हा एकुलता एक असल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तसेच अभिषेकच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजले नाही. तर, ओझर पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

Loading

तुम्ही नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन केला आहे का ?

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790