इगतपुरी प्रकरण: रे’व्ह पार्टीतील अभिनेत्री हिना पांचालसह २० जणांचा जामीन फेटाळला

इगतपुरी प्रकरण: रे’व्ह पार्टीतील अभिनेत्री हिना पांचालसह २० जणांचा जामीन फेटाळला

नाशिक (प्रतिनिधी): इगतपुरीतील रे’व्ह पार्टीप्रकरणी अभिनेत्री हिना पांचालसह २० जणांचा जामीन न्यायालयाने सोमवारी (दि.५) फेटळला असून त्यांना ७ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून एक दिवस स्थानिक गुन्हे शाखा चौकशी करणार आहे. शिवाय वापरलेले बंगलेही सील करण्यात आले आहेत.

दरम्यान, तीन कामगार, एक स्वयंपाकी आणि एका छायाचित्रकाराला जामीन मंजूर करण्यात आला आहे. पार्टीत ड्र’गचा वापर झाल्याचे तपासात निष्पन्न झाले असून स्थानिक गुन्हे शाखेकडून याप्रकरणी सखोल तपास केला जाणार आहे. मुंबई स्थित ड्र’ग्ज पेड’लरचे नाव तपासात निष्पन्न झाले असून याप्रकरणी हिनासह अन्य संशयितांची एलसीबीकडून कसून चौकशी केली जाणार आहे.

हे ही वाचा:  नाशिक: अज्ञात वाहनाच्या धडकेत ५८ वर्षीय पादचारी ठार

पार्टी झालेले स्काय ताज व त्याला लागून असलेला एक आलिशान बंगलाही सील करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी छापा मारुन अभिनेत्री हिनासह परदेशी महिला, हिंदी आणि तेलगू चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्री, कोरिओग्राफर यांना अटक केली होती. पोलिस निरीक्षक समाधान नागरे व त्यांच्या पथकाने सोमवारी इगतपुरी न्यायालयात २५ संशयितांना हजर केले.

हे ही वाचा:  नाशिक: अज्ञात वाहनाच्या धडकेत ५८ वर्षीय पादचारी ठार

न्यायाधीश पी. पी. गिरी यांच्यासमोर सरकारी वकील मिलिंद निर्लेकर यांनी सर्व संशयित आरोपींनी अ’मली व मा’दक पदार्थ बाळगत ते सेवन केल्याप्रकरणी व वापराबाबत अधिक तपास करण्यासाठी त्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात यावे, असा युक्तिवाद केला. न्यायालयाने पाच जणांचा जामीन मंजूर केला. उर्वरित आरोपींना एका दिवसाच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790